Sharad Pawar: ठाकरेंनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला.. पवारांनी सांगितलं जयंत पाटलांच्या पराभवामागचे गणित

Sharad Pawar PC In Pune: शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी का दिली याबाबत शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. कोणी कोणाला फसवलं नाही. पण, रणनीतीबाबत मतभिन्नता होती, इतकंच, असं शरद पवार म्हणाले आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Updated on

Pune News- पिंपरी चिंडवडमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी का दिली याबाबत शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. कोणी कोणाला फसवलं नाही. पण, रणनीतीबाबत मतभिन्नता होती, इतकंच, असं शरद पवार म्हणाले आहेत.

काँग्रेसकडे अधिकचे मतं होती. आमच्याकडे बारा मतं होती. ठाकरे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिली मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच आहे. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. पण, आमची रणनीती चुकली , असं शरद पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar
Sunetra Pawar: खासदार सुनेत्रा पवार मोदीबागेत शरद पवारांच्या भेटीला... राजकीय अर्थ नाही खरे कारण आले समोर

जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं, असं शरद पवार म्हणाले.

संधी आली तर डाव्यांना प्राधान्य द्यावं असं मला वाटत होतं. काँग्रेसची मतं जास्त होती. ठाकरेंकडे पुरेसी मतं नव्हती. पण, त्यांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत गणित वेगळं होतं. निवडून येण्यासाठी २३ मतं आवश्यक होती. काँग्रेसकडे माझं म्हणणं होतं, तुमच्या उमेदवाराला मतं देऊन उरलेली मतं ५० टक्के ठाकरे गटाला द्या आणि ५० टक्के मतं जयंत पाटलांना द्या, असं पवार म्हणाले.

Sharad Pawar
Pimpri-Chinchwad: अजित पवारांना धक्का! 4 पदाधिकाऱ्यांसह 24 जणांनी तुतारी घेतली हाती; शरद पवारांच्या पक्षात कोणा-कोणाचा प्रवेश? वाचा नावं

गरजेपेक्षा जास्त मतं असल्याने ती टान्सफर होत होती. जास्तीच्या काँग्रेस आमदारांनी पहिलं मतं ठाकरेंना द्यावं आणि सैनेच्या आमदारांनी दुसरं मत शेकापला द्यावं, हे जर गणित जुळून आलं असतं तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. हे गणित सगळ्यांना मान्य झालं नाही. त्यामुळे जयंत पाटील जिंकून येऊ शकले नाहीत, असं शरद पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.