Sharad Pawar: पुणे जिल्ह्यात शरद पवार देणार भाजपला अजून एक धक्का? या महिला नेत्यानी घेतली भेट

Pimpri Vidhansabha Matadar Sangha: पिंपरी विधानसभेत निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे
Sharad Pawar
Pimpri Vidhansabha Matadar Sangha
Updated on

Latest Pune News: पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भारतीय जनता पक्षाला अजून एक धक्का देणार असल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे एका महिला नेत्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षातून बडे नेते हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. समरजीत घाटगे यांनी काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. (samarjeet Gadghe With Ncp)

Sharad Pawar
Sharad Pawar : महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आपण एकत्र काम करू

तर हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. अशावेळी शरद पवार भारतीय जनता पक्षाला अजून एक धक्का देतात की काय? असे चित्र पाहायला मिळत आहे.(Bjp leaders with Sharad pawar)

भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सीमा सावळे या शरद पवार यांच्या भेटीला मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. त्या पिंपरी विधानसभेत निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे

Sharad Pawar
Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत. पिंपरी विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. अशावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी राखीव आहे. यामुळेच सावळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे.(pimpari Vidhansabha Election)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.