राज्यकर्ते आदिवासी समाजाच्या प्रश्नाबाबत उदासीन; ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खंत

पवार म्हणाले, आदिवासी समाजाने संघर्ष करत वाटचाल केली
Sharad Pawar regrets issue of tribal society junnar Chhagan Bhujbal Amol Kolhe
Sharad Pawar regrets issue of tribal society junnar Chhagan Bhujbal Amol Kolhesakal
Updated on

ओझर : राज्यकर्ते आदिवासी समाजाच्या प्रश्नाबाबत उदासीन असल्याची खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लेण्याद्री ता.जुन्नर येथे बोलताना व्यक्त केली महाराष्ट्र राज्य बिरसा ब्रिगेड व आदिवासी विचार मंचाने वीर आदिवासी मावळ्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, बिरसा मुंडा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश पेदाम,आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप मोहिते, डॉ. किरण लहामटे, अतुल बेनके, सुनिल भुसारा,आमश्या पाडवी सुभाष मोरमारे आदिवासी नेते तसेच राज्यभरातील आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले, आदिवासी समाजाने संघर्ष करत वाटचाल केली आहे. समाजाचे प्रश्न एकजुटीने सोडविण्यासाठी संघटना मजबूत करावी लागेल. विरसा मुंडा त्यागाचे प्रतिक आहे.जल,जंगल, जमीन हे त्रिसूत्र बिरसा ब्रिगेडने हाती घेतले आहे. देशात जंगल राखण्याचं काम आदिवासी करतात. विविध कायदे करूनही आदिवासींवरील अत्याचार तसेच भूकबळीच्या घटना थांबल्या नाहीत. यावेळी आदिवासी समाज बांधवांनी शरद पवार यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार केला. पवार यांनी तिरकमठा (धनुष्यबाण) उंचावत आदिवासी समाजाने केलेल्या सत्काराला दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व क्रांतीकारकांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यावेळी वैष्णवी पाडेकर हिने आदिवासी स्फुर्तीगिताचे गायन केले. आमदार अतुल बेनके यांनी स्वागत केले. बिरसा ब्रिगेडचे प्रविण पारधी यांनी प्रास्ताविक केले. बिरसामुंडा संघटनेचे अध्यक्ष सतिश पेदाम ,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, नरहरि झिरवळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे , आमदार डॉ.किरण लहामटे, अमश्या पाडवी, सुनिल भुसारा आदींची भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.