Latest Pune News: आंबेगाव येथील सहकारमंत्री दिलीप वळसे संस्थापक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वर्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये हमरी तुमरी तसेच धक्का बुक्की झाली, प्रचंड घोषणाबाजी गोंधळातच सर्व विषय आवजी मतदानाने मंजूर करत सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.
राज्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 28 वी वार्षिक सर्वसाधारण आज शुक्रवारी दुपारी कारखानास्थळावर आयोजित करण्यात आली होती. कारखान्याचे संस्थापक संचालक सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील सभास्थानी आगमन होताच उपस्थितांमधून वळसे पाटील झिंदाबाद च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.