पुणे : राज्यात सन २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधी वरुन सध्या राज्यात बरीच राजकीय धुरळा उडतो आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी नुकतचं यावर स्पष्टपणे भाष्य केलं. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. (Sharad Pawar wanted to alliance with BJP but Fadnavis did not want as CM says Bavnkule)
बावनकुळे म्हणाले, "शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते. पवारांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी भुईसपाट होईल. फडणवीस मुख्यमंत्री नको असल्याची भूमिका पवारांनी कायमचं मांडली आहे. कारण पवार हे फडणवीसद्वेषी आहेत.
पवारांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको, असाच त्यांचा अजेंडा आहे. फडणवीस यांना विरोध करायचा तसेच त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काही करू शकतात. मी आधीच सांगितलं होतं की, फडणवीस हाच त्यांचा एकमेव अजेंडा होता.
कसब्यावर भाष्य
राज्य आणि केंद्र हे डबल इंजिन सरकार मुक्ता टिळक यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करतील यावर लोकांचा विश्वास आहे. कसब्यात भाजप आणि महायुतीचे उमेदवार चांगल्या मताने जिंकून येतील. आमचे सगळे कार्यकर्ते मॅन टू मॅन प्रचार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.