Sharad Pawar: काटेवाडी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी शुक्रवारी (ता. १७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव उपस्थित होते.
मागील नऊ दिवसांपासून बारामती येथील प्रशासकीय भवन समोर चंद्रकांत वाघमोडे यांनी धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनाचे पडसाद आता बारामती तालुक्यामध्ये गावोगावी उमटू लागले आहेत.
यावेळी चंद्रकांत वाघमोडे यांचे नऊ दिवसापासून सुरू असलेल्या अमरण उपोषण आंदोलनाची राज्य शासनाने अद्याप दखल न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शासनाकडून या आंदोलनाची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा देखील इशारा धनगर समाज बांधवांकडून देण्यात आला. तसेच घटनेमध्ये असणारे धनगर समाजाचे आरक्षण शासनाने तातडीने लागू करावे अशी जोरादार मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.