Pune Fraud : शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; राजस्थानचा आरोपी जेरबंद

शेअर मार्केटबाबत यूट्यूब चॅनेल सुरू करून कंपनीत गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले.
crime news
crime newsesakal
Updated on

पुणे - शेअर मार्केटबाबत यूट्यूब चॅनेल सुरू करून कंपनीत गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पुण्यातील गुंतवणूकदारांची सुमारे २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

मिलन जिनेंद्र जैन (रा. केदलगंज वर्कशॉप, अल्वर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे लोकांचा घरबसल्या शेअर मार्केटमध्ये पैसे कमाविण्याकडे कल वाढला. याचाच फायदा घेत राजस्थानमधील सायबर गुन्ह्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या अल्वर जिल्ह्यातील आरोपी मिलन जैन याने २०२० मध्ये शेअर मार्केटबाबत यूट्यूब चॅनेल सुरू केले. त्याद्वारे सुरवातीला लोकांना शेअर मार्केटचे धडे देवून पैसा कमाविण्याबाबत मार्गदर्शन करून सबस्क्रायबर वाढविले.

आरोपी मिलन जैन याचे तब्बल ४० हजार सबस्क्रायबर झाले. त्यानंतर त्याने लोकांना विथ एप्रो या ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो असे सांगून, पुण्यातील गुंतवणूकदारांची सुमारे २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत सिंहगड रस्ता परिसरातील फिर्यादीने फसवणूक झाल्याची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दिली होती.

crime news
Two Wheeler : दुचाकीवर ट्रिपलसीट जाताय! तर मग हे वाचाच

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले आणि वरिष्ठ निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ करत आहेत.

नवी मुंबईतही फसवणुकीचा गुन्हा

आरोपी मिलन जैन याच्याविरुद्ध यापूर्वी रबाळे पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे फसवणूक आणि एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. रबाळे पोलिसांनी आरोपीला राजस्थान येथून अटक केली होती. पुणे सायबर पोलिसांनी आरोपीला तळोजा कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.