Crime News : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या बहिण-भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

ओढ्याच्या पाण्यात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयदावक दुर्दैवी घटना घडली.
Aryan kale and Anjali kale
Aryan kale and Anjali kalesakal
Updated on

शिनोली - गंगापूर खुर्द (ता. आंबेगाव) गावातील गाडेकरवाडी येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयदावक दुर्दैवी घटना काल गुरुवार ३ ऑगस्ट रोजी घडली.

कु. आर्यन अरुण काळे (वय-११) व त्याची बहीण कुमारी अंजली अरुण काळे (वय-१५) अशी मृत्त भावंडांची नावे आहेत. याबाबत आदित्य जाधव यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल दिनांक गुरुवार 23 ऑगस्ट रोजी दोन्ही भावंडे हे वरसुबाई मंदिराच्या शेजारील ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेली होती. ओढ्याला पाणी जास्त चालू आहे. मुलं बराच वेळ घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी ही दोन्ही मुले ओढ्यात मृत अवस्थेत सापडली. या घटनेची माहिती मिळतात स्थानिक नागरिकांनी त्यांना ओढ्यातुन बाहेर काढले. त्यावेळी त्यांचा श्वास बंद झालेला होता.

रुग्णवाहिका चालक गौरव बारणे व वरिष्ठ साहेब घटनास्थळी जावुन दोघांना तात्काळ घोडेगाव ग्रामीण आरोग्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. श्री हनुमान विद्यालय गंगापूर बुद्रुक येथे आर्यन हा इयत्ता पाचवी मध्ये तर अंजली ही गेल्या वर्षी इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होती.

मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गंगापूर खुर्द, गंगापूर बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर किशोर वाघज करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.