पुणे - दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली..याबाबत एका महिलेने (वय ५०) तक्रार दिली आहे. त्यावरून पुणे ग्रामीणच्या शिरूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई,ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मुलाविरुध्द शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मुलाला अटक न करण्यासाठी मांडगे यांनी खासगी व्यक्ती मुंजाळ याच्यामार्फत १० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली..अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत. पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.