Shirur Lok Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली असली; तरी त्यांच्याविरोधात कोण उतरणार, याची उत्सुकता कायम आहे. मात्र, त्यांचे मागील वेळेचे विरोधक व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश व उमेदवारीची चर्चा सुरू आहे. आयात उमेदवारापेक्षा निष्ठावंताला संधी देण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस मधील इच्छुक माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.
मात्र, शिरुर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेणार आहेत. शिरुर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांचं नाव आघाडीवर होते. त्यात महायुतीत ही जागा अजित पवारांच्या गटाला देण्यात आलीय. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्याला दुजोरा मिळाला आहे. आढळराव पाटलांनी येत्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगितलं आहे.
डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी मते : ६३५८३०
शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) मते : ५७७३४४
राहुल ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) मते : ३८०७०
जमीरखान कागदी (बहुजन समाज पक्ष) मते : ७२४७
विजयी उमेदवाराचे मताधिक्य : ५८,४८६
२००४ : शिवसेना
२००९ : शिवसेना
२०१४ : शिवसेना
२०१९ : राष्ट्रवादी
भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्यास एखादा दिग्गज ‘नटसम्राट’ रिंगणात उतरणार.
खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते हे आढळराव पाटील यांना साथ देणार का?
पुणे- नगर व पुणे- नाशिक रस्त्यावरील सततची वाहतूक कोंडी
रांजणगाव, चाकण एमआयडीसीतील घटत चाललेला रोजगार आणि ठेकेदारीचा वाद
कुकडी प्रकल्पातील पाण्याचे वाटप. डिंभे बोगद्याला विरोध.
चासकमान कालव्याची गळती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.