तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील १३ गावात अवकाळी पाऊस व गारठ्यामुळे एकूण ३४१ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी( विस्तार) डॉ नवनाथ पडवळ यांनी सांगितली.
दरम्यान, बुधवारी दिवस- रात्र रिमझिम व संततधार अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यातील विविध गावात शेतात उघड्यावर वास्तव्य करीत असलेल्या मेंढपाळांच्या मेंढरावर अवकाळी पावसाने घाला घातला असून, पावसात गारठल्याने तालुक्यातील ३४१ मेंढयांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित मेंढपाळाना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यातील विविध गावात मृत झालेल्या मेंढ्यांची संख्या :- निमगाव म्हाळुंगी (१४), न्हावरा (१३), आंधळगाव (११), बाभुळसर (१०), शिरसगाव ( ३३), केंदूर (२०), पाबळ (२५), कर्डेलवाडी (०४), मलठण (१०५), फाकटे (३८), पिंपरखेड (०४), पिंपरी दुमाला (६०), रांजणगाव गणपती (०४). तालुक्यात आणखी मृत मेंढ्यांचा आकडा वाढण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे.
तालुक्यातील विविध गावातील मृत मेंढ्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून, पशु संवर्धन खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे, मेंढपाळांना त्यांच्या मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करणे सहज शक्य झाले असल्याचे शिरुर तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ नवनाथ पडवळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.