न्हावरे : आपण सहसा यात्रेत पाळणा पाहतो त्यामध्ये बसुन त्याचा आंनद घेतो असाच फोटो मध्ये दिसणारा सुद्धा एक पाळनाच आहे पण हा साधा सुधा पाळणा नसून हा जगातला सगळ्यात मोठा पाळणा आहे. अशी त्याची नोंद झाली आहे त्याची उंची साधारणपणे आठशे १५ फूट आहे, ज्याची नुकतीच निर्मिती दुबई या ठिकाणी झालेली आहे. यामध्ये अभिमानाने सांगायचे म्हणजे या पाळण्याच्या मुख्य डिझायनर टिम मध्ये शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील गणेश मारुती कांडगे हे प्रमुख म्हणून कार्यरत होते नुकतेच या भव्य दिव्य पाळण्याचे काम पुर्ण झाले आहे. यापुर्वी लासवेगास अमेरिकेत ५४५ फूट उंची असणारा पाळणा जगातला सर्वात मोठा पाळणा होता.
या नुकत्याच बनवलेल्या ८१५ फूट उंचीचा पाळण्यात एकावेळी २ हजार लोकांना आरामात फिरवता येईल एवढी क्षमता आहे, २ हजार लोक म्हणजे आपल्याकडच्या छोट्या गावांची लोकसंख्या तेवढी असते, म्हणजे एखादं छोटं संपूर्ण गाव एका वेळी फिरवता येईल,
या पाळण्यात तब्बल ४८ कप्पे आहेत, हे सर्व कप्पे वातानुकूलित आहेत, हा प्रत्येक कप्पा एखाद्या बस किंवा एखाद्या खोली पेक्ष्या मोठा आहे, ज्यामध्ये प्रत्येकी ४० लोक आरामात बसू शकतात किंवा आतमध्ये फिरू पण शकतात, पाळण्याचे काम तब्बल पाच हजार ते सहा हजार कामगार ६ वर्ष अहोरात्र काम करत होते, हे काम चालू असताना हा प्रकल्प एवढा भव्य दिव्य होता की या मध्ये एखादी चूक हजारो कोटीचे नुकसान आणि हजारो जीव धोक्यात जाण्यासारखे होते,
यासाठी अंदाजे २ हजार कोटी एवढा खर्च आलेला आहे, या पाळण्यात बसल्यावर बरेच वेळा ढगांच्या वर असल्याची अनुभूती येते, हा पाळणा तयार करताना जगातील १० देश एकत्र आलेले होते, हा प्रकल्प पूर्ण करणे एक जागतिक अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार होता, या मध्ये वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट एवढी भव्य वापरली जात होती की यापूर्वी ती कधीच वापरली गेली नव्हती, यासाठी जगातल्या सर्वात शक्तिशाली अश्या दोन क्रेनचा वापर केला गेला, दुबईमध्ये अनेक पर्यटकांना या पाळण्याबरोबर फोटो किंवा सेल्फी काढण्याचा मोह होतो तेव्हा या पाळण्यापासून किमान एक ते दीड किमी लांब गेल्याशिवाय हा पूर्ण पाळणा चित्रबद्ध करता येत नाही, यावरून या प्रकल्पाची भव्यता लक्षात येते,
शिरूर तालुक्यातील न्हावरेकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे या पाळण्याच्या मुख्य डिझायनर टीम मध्ये न्हावरे ता शिरूर येथील गणेश कांडगे कार्यरत होते. गणेश कांडगे यांचे प्राथमिक व माध्यमिक न्हावरे येथे झाले असून ते सध्या यूरोपातील नेदरलँड येथील कंपनीमध्ये कार्यरत आहेत,त्यांच्या कंपनीने ह्या प्रकल्पाचे डिझाइनिंगचे काम घेतले होते, ज्यांनी गेल्या ६ वर्षांपासून अनेक अडचणींचा, आव्हानांचा सामना करून हा जगातील एक आश्चर्य असणाऱ्या प्रकल्पामध्ये आपले मौल्यवान योगदान दिले, दुबई मध्ये गेल्यावर हा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा आपली छाती नक्कीच अभिमानाने फुगेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.