''नाश्ता करा, मी जाते'' मुलांसाठी ठरलं आईचं शेवटचं वाक्य

''नाश्ता करा, मी जाते'' मुलांसाठी ठरलं आईचं शेवटचं वाक्य
Updated on

पुणे : उरवडे येथे रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत शितल खोपकर यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या यांच्या मागे त्यांचे पती दत्तात्रय खोपकर मुलगा तेजस खोपकर आणि मुलगी तनुजा खोपकर आहेत. (Shital Khopkar Died in mulshi urawade chemical company svs aqua technologies fire broke out)

तेजस आयटीआय करतो आणि तनुजा आठवीमध्ये शिकते. तेजस रोज आईला कंपनीत सोडायला आणि घ्यायला जायचा. सकाळी मुलांना उठवून ''आवरून घ्या, नाश्ता करा. मी जाते'' असे सांगून त्या घराबाहेर पडल्या ते कधीही परत न येण्यासाठी. त्यांचे हे वाक्य त्यांच्या मुलासाठी शेवटचं ठरले.

''नाश्ता करा, मी जाते'' मुलांसाठी ठरलं आईचं शेवटचं वाक्य
मुळशी : उरवडे आगीत पतीच्या समोरच पत्नी भस्मसात

मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली. उरवडे येथील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीत ही आग लागली. या दुर्घटनेत 18 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही. यामध्ये 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिला आहेत. 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. 15 दिवसांपूर्वी देखील या कंपनीला आग लागल्याची माहिती येथील स्थानिक देत आहेत.

''नाश्ता करा, मी जाते'' मुलांसाठी ठरलं आईचं शेवटचं वाक्य
मुळशी : उरवडे आगीत पतीच्या समोरच पत्नी भस्मसात

दरम्यान, या घटनेत उरवडे येथे राहणाऱ्या मृत शितल खोपकर यांच्या आई 8 मेला वारल्या होत्या, त्यामुळे 15 दिवसांची सुट्टी घेतली होती. काल आईच्या महिन्याचा कार्यक्रम होता. बहुली येथे माहेरी जेवायला बोलवले होते, पण कंपनीने सुट्टी न दिल्याने शीतल खोपकर या कामावर गेल्या आणि आगीच्या घटनेत मृत पावल्या.

''नाश्ता करा, मी जाते'' मुलांसाठी ठरलं आईचं शेवटचं वाक्य
मुळशी : उरवडे येथील कंपनीत आगीचे तांडव, 18 कामगारांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.