Bharatshet Gogawale : शिवसेना प्रतोद भरत गोगावलेंचे मंत्रीपदासाठी महादेवाला साकडे

हांडेवाडी रस्त्याच्या श्रीराम चौकात प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
shiv sena bharatshet gogawale taking blessings from lord mahadev for minister post politics
shiv sena bharatshet gogawale taking blessings from lord mahadev for minister post politicsSakal
Updated on

हडपसर : "सत्तेत सहभागी झाल्यावर लगेचच मंत्री होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजूनही मी मंत्री झालेलो नाही. प्रभू श्रीरामांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. येथील महंमदवाडीचे नामकरण आता महादेववाडी होणार आहे.

त्यामुळे सर्व भक्तांनी आता मी मंत्री व्हावे, यासाठी प्रार्थना करावी,' असे आवाहन करीत शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी "हे महादेवा, मला मंत्री करा,' असे साकडेही घातले.

हडपसर-हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकात शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे.

या शिल्पाचे भूमिपूजन शिवसेना (शिंदे गट) उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रतोद आमदार गोगावले बोलत होते.

शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे, शिवसेना महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी, युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी, शहर प्रवक्ता अभिजित बोराटे, शरद मोहोळ, तुषार हंबीर, लक्ष्मण आरडे, विकी माने, संतोष रजपूत, अमर घुले आदिंसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतोद गोगावले म्हणाले, "चांगल्या कामासाठी पुढे जाणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे शिवसेनेचे कर्तव्य आहे.

भानगिरे चांगले काम करीत असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना सगळ्यात जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. महंदवाडीच्या महादेववाडी नामकरणाला गती देऊन ते काम पूर्ण केले जाईल.'

shiv sena bharatshet gogawale taking blessings from lord mahadev for minister post politics
Pune News : अजित पवारांचे आरोप बेदखल, तर पटेलांना टोला; शरद पवारांच्या निशाण्यावर बंडखोर नेते

शिवसेना (शिंदे गट) उपनेते माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, "श्रीरामाचा पुतळा उभारण्यासाठीची मंजूरी मिळवताना महापालिका व सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. मात्र, एखादं काम मनांवर घेतलं की ते पूर्ण करायचं, हा नानांचा स्वभाव आहे.

त्यासाठी अनेक अडचणींशी त्यांना संघर्ष करावा लागला. आज भूमिपूजन झाले असून, येत्या दीड महिन्यातच या ठिकाणी श्रीरामाचे पूर्णाकृती शिल्प बसविण्यात येणार आहे. ठिकठिकाणी वाचनालय आणि सुंदर चित्र साकारून शहराचे सुशोभीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.'

शिवसेना शहर प्रमुख भानगिरे म्हणाले, "सहा वर्षांपूर्वी श्रीराम चौकाचे नामकरण तसेच पुतळा उभारणीसाठी पालिकेत प्रस्ताव देऊन मंजूर करून घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून व शिवाजीराव आढळराव पाटील भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ फूट लांब आणि २३ फूट उंच असे श्रीरामाचे शिल्प आता येथे उभे राहत आहे.

लवकरच महंमदवाडीचे महादेववाडी नामकरण करून तेथील तुळजाभवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हडपसर मतदार संघात दीड वर्षांत सुमारे दोनशे कोटींचा निधी उपलब्ध करून विकास कामे केली जात आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.