Shirur Lok Sabha Constituency: शिरूर लोकसभा शिवाजी आढळराव पाटील लढणार? म्हणाले, 'निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच...'

Shirur Lok Sabha Constituency: शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, अशी शिवाजी आढळराव पाटील यांची इच्छा आहे. पण शिरुर लोकसभेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत.
Shirur Lok Sabha Constituency
Shirur Lok Sabha ConstituencyEsakal
Updated on

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे गेली पाच वर्षे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निवडून आलेला माणूस फिरत नाही. पण दादा तुम्ही सतत संपर्क ठेवून जनतेची कामे करत आहात, अशा परिस्थितीत चुकीच्या माणसाला निवडून देण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीत तुम्ही शिरूरमधून निवडणूक लढवा. असा एकमुखी आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील आणि आदेश देतील त्याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे," असे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (ता.२९) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बुधवारी रात्री चर्चा झाली. त्यानुसार अजून शिरूरचे जागावाटप झाले नाही. चार-पाच दिवसांत याबाबतचा निर्णय होईल. पण शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले होते. त्यांनी सर्वाधिक आमदार व ग्रामपंचायतींची संख्या आमच्याकडे असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी, अशी मागणी केली आहे.

Shirur Lok Sabha Constituency
Pune Rain : पुण्याला पावसाचा दणका! राज्यात पुन्हा बरसणार अवकाळीचा तडाखा; 'या' जिल्ह्यांत पावसासह गारपीटीचा इशारा

कदाचित ही जागा राष्ट्रवादीला जाऊ शकते किंवा शिवसेनेकडे राहू शकते. शिवसेनेकडे राहिल्यानंतर प्रश्नच उरत नाही पण जर राष्ट्रवादीकडे गेली तर त्यांचा निर्णय असेल उमेदवारी कोणाला द्यायची. जर राष्ट्रवादीकडून विचारणार आली किंवा महायुतीकडून विचारणा झाली तर याबाबत काय करावे याविषयी आज कार्यकर्त्यांची मते मी जाणून घेतली. माजी आमदार शरद सोनवणे, अरुण गिरे, रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, संतोष डोके, सचिन बांगर, प्रवीण थोरात, सचिन काजळे, बापूसाहेब शिंदे उपस्थित होते.

Shirur Lok Sabha Constituency
माध्यमिक शिक्षण कार्यालयातील 'स्कॉड मॅडम'चा दणका! कपड्यात अन्‌ ओढणीत लपविलेली कॉपी शोधून काढलीच; बारावीच्या परीक्षेत २ दिवसात ३ विद्यार्थी पकडले

मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. आमदार दिलीप मोहिते यांच्यासमवेत यापूर्वीही संपर्क व चर्चा झालेली आहे. मी त्यांना कोणतीही हानी पोहोचवलेली नाही. जर त्यांच्या मनात गैरसमज असतील तर ते पुन्हा चर्चा करून दूर केले जातील, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.