शिवाजीनगर : वडारवाडी वारंवार ड्रेनेज तुंबन्याचे प्रमाण वाढले

आगोदरच रस्ता अरूंद आणि नियमित रस्त्यावर उभे असलेले ड्रेनेज काढण्याचे वाहन
 ड्रेनेज
ड्रेनेजsakal
Updated on

शिवाजीनगर : शिवाजीनगर परिसरातील वाडारवाडी येथे पावसाळ्यापासून वारंवार ड्रेनेज तुंबत असल्याने नागरिकांना घाणीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. संत ज्ञानेश्वर पादुका चौकातून गोखलेनगर, सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी मंजाळकर चौकातून, वडारवाडी मधून नागरिक जातात. आगोदरच रस्ता अरूंद आणि नियमित रस्त्यावर उभे असलेले ड्रेनेज काढण्याचे वाहन, त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होते. रसस्त्यावर घाणीचे पाणी वाहत असताना नागरिकांना रस्ता ओलांडणे अशक्य होते.

कित्येकांच्या दारासमोर घाणीचे पाणी वाहते, त्यामुळे घरात वास येतो,रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. वारंवार ड्रेनेज तुंबल्याने नागरिक वैतागले आहेत. ड्रेनेच स्वच्छ करण्यासाठी आगोदर वरतून खाली यायला पाहिजे परंतु खालून वरती स्वच्छ करतात त्यामुळे पुन्हा पुन्हा ड्रेनेज तुबले जाते.

 ड्रेनेज
औरंगाबाद : ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर टाळा गर्दी

"कायम स्वरूपी तोडगा काढला जात नाही.दिवसभर किमान दहा ड्रेनेज स्वच्छ करायला हवे, परंतु एक दोनच स्वच्छ केले जातात. क्षमतेनुसार महापालिकेच्या वतीने कामं केली जात नाहीत.आर्धवट कामं केल्यानं रहिवाशांना वारंवार एकच समस्या भेडसावते"

-विजय गोसावी, रहिवासी वडारवाडी

" हे ड्रेनेज कालच स्वच्छ केलं होतं,अज पुन्हा ओव्हरफ्लो झालं. वारंवार घरासमोर ओव्हरफ्लो होत असल्याने घरात वास येतो.तीन,चार दिवसाला हे ओव्हर फ्लो होतं"

-अनिल जगताप, रहिवासी वडारवाडी

"ड्रेनेज आमच्या दुकानासमोर सारखं ओव्हर फ्लो होतं, दिवसभर दुकानात थांबावे लागले परंतु या घाणीमुळे बसवत नाही.तक्रार केल्यावर देखील स्वच्छ करायला लवकर येत नाहीत.याची आठवड्याला तपासणी केली पाहिजे परंतु केली जात नाही"

-आरुणा साठे, दुकानदार वडारवाडी.

" गाड्या वेगाने आल्यावर दुकानात घाण पाणी येतं,वास येतो, पुण्यातून जाता, येता येत नाही.पाऊस सुरू झाला की तुबण्याचे प्रमाण वाढते .सांडपाणी,ड्रेनेजचे रस्त्यावर वाहते त्यामुळे नागरिकांना त्वचेचे आजार होतील"

-प्रिन्स राठोड, दुकानावर वडारवाडी.

"एका ठिकाणी लाईन खाली,वरती झाली आहे. त्यामुळे पाणी लवकर तुंबते,या संदर्भात मुख्य खात्याला कळवलं आहे.लाईन बदलून घेणार आहेत"

-सागर सपकाळ, कनिष्ठ अभियंता

"मोठ्या व्यासाची लाईन शक्य तो तुंबत नसते परंतु जुनी लाईन असल्याने ती खचली आहे.त्यामुळे पाणी तुंबते.जेवढी लाईन खराब झाली आहे तेवढी बदलण्यासाठी टेंडर लावत आहोत".

- शिवाजी मस्के ,कनिष्ठ अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.