३०० बेडच्या शिवनेरी जम्बो कोविड सेंटरचे काम प्रगतिपथावर

‘अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे होणाऱ्या ३०० बेडच्या शिवनेरी जम्बो कोविड सेंटरचे काम प्रगतिपथावर आहे. येथे लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSakal
Updated on

मंचर - ‘अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे होणाऱ्या ३०० बेडच्या (Beds) शिवनेरी जम्बो कोविड सेंटरचे (Shivneri Jumbo Covid Center) काम प्रगतिपथावर आहे. येथे लहान मुलांसाठी (Child) विशेष व्यवस्था केली आहे. प्रशासन व लोकसहभागातून उपलब्ध झालेल्या २४ कोटी २४ लाख रुपये निधीतून (Fund) दहा जूनपर्यंत सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. (Shivneri Jumbo Covid Center Work 300 Beds Dilip Walse Patil)

अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. २९) कोरोना आढावा बैठक झाली. त्यावेळी वळसे पाटील यांनी माहिती दिली. या वेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी सारंग कोडीलकर, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील, संजय गवारी, डॉ. अशोक नांदापूरकर, रमा जोशी, जालिंदर पठारे, डॉ. अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

Dilip Walse Patil
मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही - प्रकाश आंबेडकर

कोडीलकर यांनी कोविड रुग्णांची संख्या, उपचार व उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रसाद म्हणाले, ‘आंबेगाव तालुक्यात ॲलर्ट व हाय ॲलर्ट एकूण २३ गावे असून, त्यामध्ये मंचर, घोडेगाव, पेठ, अवसरी, निरगुडसर, पारगाव, शिनोली आदी मोठ्या गावांचा समावेश आहे. या गावांवर प्रशासन अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. स्कील डेव्हलपमेंटअंतर्गत बेड असिस्टंटचे प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांना कोविड सेंटरमध्ये प्राधान्याने भरती केले जाईल.’

‘पुणे जिल्हा दूध संघ व बाजार समितीमार्फत शिवनेरी कोविड सेंटरला अनुक्रमे २५ व १५ लाख रुपयांची मदत केली जाईल,’ असे संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे व बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी सांगितले.

Dilip Walse Patil
पुणे शहरात रविवारी ७२ केंद्रांवर होणार कोरोना लसीकरण

या सेंटरचा उपयोग आंबेगावप्रमाणेच जुन्नर, शिरूर, खेड तालुक्यांतील रुग्णांना होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक आरोग्य दूत शिवनेरी सेंटरमध्ये थांबून संबंधित तालुक्यातील रुग्णांचे ॲडमिशनचे काम करणार आहे. येथे पायाभूत सुविधांसाठी सहा कोटी रुपये खर्च होणार आहेत. उर्वरित १८ कोटी रुपये औषधे, ऑक्सिजन, डॉक्टर, कर्मचारी, जेवण, सफाई कामगार व अन्य सुविधांसाठी वर्षभर खर्चाचे नियोजन आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यास खर्चही कमी होईल. येथे वसतिगृहाच्या दोन इमारती असल्याने बांधकामावरील खर्च वाचलेला आहे.

- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.