Shivneri Museum : शिवनेरी संग्रहालयाची जुनीच घोषणा नव्याने...; स्पष्टता नसल्याने संभ्रम

शिवजन्मभूमी जुन्नर तालुका येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
Devendra fadnavis and ajit pawar
Devendra fadnavis and ajit paware sakal
Updated on

आपटाळे - शिवजन्मभूमी जुन्नर तालुका येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री पवार यांनी ही घोषणा केली.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत शिवभक्त व पर्यटकांमधून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तर जुन्नर तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल असे मत शिवभक्तांमधून व्यक्त केले जात आहे. मात्र सन 2023 24 च्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी बालसंस्कार सृष्टी उभारण्याची घोषणा केली होती या घोषणेचे काय झाले असा देखील सवाल शिवभक्तांमधून उपस्थित केला जात आहे.

सह्याद्री गिरी भ्रमण संस्थेचे अध्यक्ष राहुल जोशी यांनी सांगितले की, गतवर्षीच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी बालसंस्कार सृष्टी उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती.

मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्याने वडज (ता.जुन्नर) येथे शिवसंग्रहालय उभारण्याची घोषणा केली आहे. मात्र याबाबत स्पष्टता नाही, मागील वर्षीच्या घोषणेचे काय झाले? आणि आता नव्याने केलेली घोषणेची अंमलबजावणी तातडीने व्हावी.

तसेच संस्थेच्या मागणी आणि पाठपुराव्यानुसार शिवनेरी वरील अंबरखाना इमारत संग्रहालयासाठी देखील 5 कोटींची तरतूद असावी अशी आमची मागणी कायम आहे. अंबरखाना इमारत संवर्धनासाठी दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त आहे. संग्रहालयाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांना पत्र दिलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()