Maharashtra Political Updates: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात हालचालींना वेग आला आहे. तर इच्छूक उमेदवारांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. यादरम्यान पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेला पुण्यातून माघार घेण्यात आली आहे. सामटीव्हीने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. त्यामुळे २०१९च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही शिवसेना पुणे शहरात एकही जागा लढवणार नाही. मात्र भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या जागा त्यांच्यासाठी सोडाव्या लागणार आहेत.
दरम्यान मिळालेल्या मागितीनुसार पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर या दोन जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. या दोन जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार दिला जाऊ शकतो. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून पुण्यातील हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. या जागांवरून मगादेव बाबर, पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
शिवसेना फुटीनंतर देखील कोकणात शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार आहे. महायुतीमध्ये कोकणात सर्वाधिक जागा शिवसेना लढणार असल्याचे सांगितले जात आहे. तर भाजपाला चार ते पाच जागेवर समाधान मानावा लागणार आहे. अजित पवार गटाला कोकणात केवळ 2 जागा मिळू शरतात अशी सूत्रांची माहिती आहे.
दसऱ्यापर्यंत भाजपची पहिली यादी येणार असल्याचे सांगितले जात आहे. काल रात्री सागर बंगल्यावर भाजपच्या निवडक नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. यामध्ये मुंबई, कोकण विभागानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा निहाय बैठका तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बैठकही 2 दिवसांत पार पडणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हरियानातील विजयानंतर महायुतीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.