Sushma Andhare: "उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली, पुन्हा एकदा..."; सुषमा अंधारेंच्या ट्विटनं खळबळ

गेल्या अनेक दिवसांपासून गृहखात्याला त्या टार्गेट करत असून पोलीस दलातील कथीत गैरप्रकारांवर त्या भाष्य करत आहेत.
Sushma Andhare: "उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली, पुन्हा एकदा..."; सुषमा अंधारेंच्या ट्विटनं खळबळ
Updated on

पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्याकाही काळापासून राज्याच्या गृहविभागाला टार्गेट केलं आहे. पोलीस दलातील गैरप्रकारांवर त्या भाष्य करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी खळबळ उडवून देणारं ट्विट केलं आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. (Shivsena Sushma Andhare again targated Devendra Fadnavis over Pune Police)

फडणवीसांना केला सवाल?

अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यामध्ये आरोपींना घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन रस्त्याच्या कडेला थांबवून पोलीस काही तरुणांकडून वस्तू स्विकारुन त्या या व्हॅनमध्ये ठेवताना दिसत आहेत. पुण्याच्या येरवडा जेल भागातील हा व्हिडिओ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकारामुळं अनेक सवाल त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहेत. (Latest Marathi News)

Sushma Andhare: "उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली, पुन्हा एकदा..."; सुषमा अंधारेंच्या ट्विटनं खळबळ
Video: प्रचाराच्या बसचा लागला ब्रेक अन् मंत्री महोदय टपावरुन थेट...; तेलंगणात प्रचारादरम्यान दुर्घटना!

अंधारेंनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

"सुषमा अंधारे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जनस्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीटं पुरवली जात आहेत? स्थळ : पुणे जेल रोड"

Sushma Andhare: "उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली, पुन्हा एकदा..."; सुषमा अंधारेंच्या ट्विटनं खळबळ
Bihar Reservation: बिहारमध्ये आता 65 टक्के आरक्षण; विधानसभेमध्ये दुरुस्ती विधेयक मंजूर

ललित पाटील प्रकरणावरुन आक्रमक

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन देखील सुषमा अंधारे यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. ललित पाटीलला सत्ताधारी पक्षातील लोकांचा पाठींबा आहे का? ज्या ससून रुग्णालयातून उपचारादरम्यान तो फरार झाला त्यापार्श्वभूमीवर रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा यात हात आहे का? असे अनेक सवाल विचारत त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. यावरुन त्यांनी फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.