सामाजिक प्रश्‍नांवर जनजागृतीसाठी लघुपटाला लोकाश्रयाची गरज : मकरंद अनासपुरे

पुणे लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण
makarand anaspure
makarand anaspuresakal
Updated on

पुणे : लघुपट हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून सामाजिक प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतात. लघुपट हे आजच्या तरुण पिढीचे जवळचे माध्यम आहे. हे माध्यम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी लघुपटाला लोकाश्रय मिळण्याची गरज आहे.’’ असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

मराठी चित्रपट परिवारातर्फे आयोजित अकराव्या पुणे लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. चित्रपट निर्मात्या माधुरी आशीरगडे, ज्येष्ठ लेखक श्रीकांत कुलकर्णी, राम झोंड, कार्यकारी निर्माता सुनंदा काळूसकर, डॉ. भालचंद्र सुपेकर, अनुप जोशी आदी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी ‘मॅरेज प्रपोजल’ हा तमीळ लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर ‘कालीपिली’ या लघुपटासाठी अमोल करंबे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटासाठी ‘गुप्त’ आणि ‘धागा’ या लघुपटांना गौरविण्यात आले.

अनासपुरे म्हणाले, ‘‘चित्रपटाकडे आजही लोक मनोरंजन म्हणून पाहत असले तरी, चित्रपट ही सुद्धा समाजाची एक गरज आहे. लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटगृह बंद असल्यामुळे कलाकारांपासून ते सर्वसामान्य कामगारांपर्यंत अनेकांचे हाल झाले आहेत. लवकरात लवकर चित्रपटगृह सुरू झाली आणि लोकांचा प्रतिसाद मिळाला तर ही परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल.’’या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप जोशी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.