रेशन दुकानांमध्ये तांदळाचा तुटवडा, डाळीही गायब

Ration-Shop
Ration-Shop
Updated on

पुणे - पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील चणाडाळ आणि नोव्हेंबर महिन्यातील तांदूळ उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे रेशन दुकानांमध्ये सध्या डाळ आणि तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे चणा भरडून डाळ तयार करणाऱ्या पुरवठादाराकडील डाळीचा साठा संपला आहे. तांदळाची उचल ३० नोव्हेंबरपर्यंत न झाल्यामुळे कार्डधारकांना मोफतचा तांदूळही मिळालेला नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत गरिबांना धान्याची अडचण येऊ नये, यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना मोफत धान्य आणि डाळ वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविली. दिवाळीच्या दिवसांत धान्य, डाळी, साखर वेळेवर उपलब्ध झाली. त्यामुळे रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला. 

पीएमजीकेवाय योजनेतील ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील चणा डाळ मिळालेली नाही. केंद्र सरकारकडून राज्याला अख्खा चणा उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारने चणा भरडून त्याची डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चणा भरडणाऱ्या पुरवठादाराकडील चणा संपल्यामुळे रेशनवर डाळ उपलब्ध झालेली नाही.

रेशन दुकानदारांनी डाळ आणि तांदूळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. परंतु चार महिन्यांची चणा डाळ आणि नोव्हेंबरचा तांदूळ रेशन दुकानदारांना मिळालेला नाही. तो उपलब्ध होताच वाटप करण्यात येईल. 
- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर

भारतीय खाद्य महामंडळाकडून तांदूळ उचलण्यास मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला आहे. काही परिमंडळात तांदूळ वाटप करण्यात आला आहे. केंद्राकडून मुदतवाढ मिळताच उर्वरित कार्डधारकांना तांदूळ वितरित करण्यात येईल. तसेच, डाळीसाठी पाठपुरावा सुरू असून, पुरवठादारांकडून डाळ उपलब्ध होताच वितरित करण्यात येईल.
- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.