धनकवडी : संत श्री गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिनानिमित्त सहकारनगरमधील श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा प्रतिष्ठानतर्फे मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट केली होती. तसेच श्री गजानन महाराज यांच्याभोवती फुलांची आरास केली होती. मंदिरात दिवसभर ‘गण गण गणात बोते’चा गजर घुमत होता.
सहकारनगरमधील मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रविवारी (ता. ३) सकाळी सात वाजता महाराजांना महाअभिषेक घालून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिरापासून दत्तवाडी पोलिस स्टेशनमार्गे राम मंदिर, हरिहरेश्वर मंदिरापर्यंत पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला. त्यानंतर अध्ययन वाचन आणि आरती झाली. तसेच महाप्रसादाचे आयोजन केले होते.
दिवसभर दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये श्री गजानन अष्टक व श्री गजानन बावन्नी सामुदायिक पठण केले. सप्ताहात पांडुरंग महाराज घुले, प्रमोद महाराज जगताप, योगीराज महाराज गोसावी पैठणकर, वैभव महाराज राक्षे, रामभाऊ महाराज उन्हाळे, डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांची कीर्तने झाली. ज्ञानेश्वर महाराज गावंडे यांचे काल्याचे कीर्तन झाले.
दरम्यान सायंकाळची महाआरती अामदार माधुरी मिसाळ, वसंत मोरे, महेश वाबळे यांच्या हस्ते झाली. आंतरराष्ट्रीय आयुर्वेदाचार्य डॉक्टर के. वासू यांच्या हस्ते श्री गजानन आरोग्य मंदिराचा शुभारंभ झाला. या माध्यमातून भाविकांना मोफत वैद्यकीय सल्ला व अल्पदरात आरोग्य तपासणी करता येणार आहे. मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पौर्णिमा पवार, सुधीर पुरंदरे, प्रताप बाठे, खजिनदार योगेश पावशे, विश्वस्त नरेंद्र बाकले, संजय पोमण, अनंत खर्चे, सभासद सुभाष जिर्गे आदींनी आयोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.