Shri Chhatrapati Sugar Factory : छत्रपतीचा पहिला हप्ता २९०० रुपये प्रतिटन

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चालू वर्षीच्या गळीत हंगामाला लवकरच सुरवात होणार आहे.
chhatrapati sugar factory bhavaninagar
chhatrapati sugar factory bhavaninagarsakal
Updated on

वालचंदनगर - भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना चालू वर्षीच्या सन २०२३-२४ गळीत हंगामामध्ये उसाचा पहिला हप्ता २९०० रुपये प्रतिटन देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चालू वर्षीच्या गळीत हंगामाला लवकरच सुरवात होणार आहे. कारखान्याच्या गव्हाण पुजन नुकतेच करण्यात आले आहे. यासंदर्भात काटे व पाटील यांनी सांगितले की,चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे कारखान्याचे कार्यक्षेत्रात अंदाजे सभासदांचा ८ लाख मेट्रीक टन व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनचा २ ते २.२५ लाख मेट्रीक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल.

चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये १०.२५ मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्ष्ठि असून त्यानुसार कारखान्यातील मशिनरी रिपेअरिंग व ओव्हर हॉलिंग साठी खर्च केला आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेस अॅडव्हान्स वाटप केलेला आहे. परंतु काही सभासद इतर कारखान्यांकडून जादा दर मिळेल या अपेक्षेवर इतर कारखान्यानां ऊस देत आहेत.

अशा परिस्थितीत कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर गेला तर कारखान्याचे गाळप कमी होऊन आपल्या कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे सभासदांच्या मालकीची ही संस्था टिकवण्यासाठी सर्वच सभासदांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सभासदांनी या गळीत हंगामात त्यांचा ऊस इतर कारखान्यांना न देता आपल्याच छत्रपती कारखान्याला गळीतासाठी द्यावा.

उसाचे जास्तीजास्त गाळप झाले तर साखर व मोलॅसेस उत्पादन तसेच वीज निर्मिती वाढ होणार असून कारखान्याच्या उत्पन्नात निश्‍चित वाढ होईल. तसेच विस्तारवाढ व सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जातून तसेच आर्थिक अडचणी मधून बाहेर पडण्यास मदत असून सभासदांना आणखी वाढीव ऊस दर देणे शक्य होईल.

chhatrapati sugar factory bhavaninagar
Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवारी- रविवारी मेगाब्लॉक!

या वर्षीच्या हंगामापुरता विचार करु नये...

यापूर्वीच्या गळीत हंगामामध्ये छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस शिल्लक असताना कारखान्याने तोटा असून सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप करण्याचा प्रयत्न केलेला होता. पुढील वर्षीसह आगामाी गळीत हंगामामध्ये सर्वच साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊसाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर साखर कारखाने उस नेणार नाहीत.

अशावेळी आपलाच कारखाना सभासदांच्या संपूर्ण उसाचे निश्‍चित गाळप करणार असून सभासदांनी चालू गळीत हंगामापुरता विचार न करता आपला सर्व ऊस छत्रपती सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.