Pune News : शिरसाईच्या पाण्यासाठी १४ गावातील शेतकरी उद्यापासून उंडवडीत चक्री उपोषणावर...

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शिरसाईच्या लाभ क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही.
shri sai water issues 14 village farmers on strike pune news
shri sai water issues 14 village farmers on strike pune newsSakal
Updated on

उंडवडी : खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ तलावात पाणी सोडून शिरसाई योजनेद्वारे लाभार्थी गावात आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी १४ गावातील शेतकरी उद्यापासून ( ता. 22 ) उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथील श्री. संत तुकाराम महाराज पालखी तळावर चक्री उपोषणाला बसणार आहेत.

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शिरसाईच्या लाभ क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम वायाला गेला असून सद्यस्थितीला या भागात तीव्र चारा व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकर्यानी खरीप हंगाम व रब्बी हंगामासाठी शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाला अनेकदा केली आहे. मात्र संबधित विभागाने तीन वेळा वेगवेगळ्या तारखा देवून शेतकर्यांची निराशाच केली आहे.

shri sai water issues 14 village farmers on strike pune news
Pune : मेंगडेवाडी गणेश देवस्थानला तीर्थक्षेत्राचा "क" दर्जा मिळवून देण्यासाठी आढळराव पाटील यांना सोबत घेऊन प्रयत्न करणार - वळसे पाटील

त्यामुळे शेतकरी संतापले असून वेगवेगळ्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष व लाभार्थी शेतकरी उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे १४ गावातील शेतकर्यानी शिरसाईच्या पाण्यासाठी चक्री उपोषणाचे हत्यार उपासले आहे. उपोषणाच्या नियोजनाची बैठक (ता. 21 ) गुरुवारी पार पडली. यामध्ये उद्यापासून १४ गावातील शेतकरी चक्री उपोषणाला बसणार आहेत. याबाबत नुकतेच नियोजन बैठक घेण्यात आली.

शुक्रवारपासून दररोज किमान ५० शेतकरी उपोषणाला बसतील. असा प्राथामिक अंदाज आहे. जो पर्यंत पाणी सोडणार नाहीत. तो पर्यंत चक्री उपोषण सुरु ठेवणार आहे. अशी माहिती तुकाईमाता पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष मधुकर भोसले व जालिंदर वायसे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.