आभाळच कोसळलं! सांगा, कसे जगायचे?

 श्‍वेता चंदनशिवे
श्‍वेता चंदनशिवेSYSTEM
Updated on

पुणे : वेळ - सकाळी ९ वा. सोमवार ३१ मे, ठिकाण- चिखलवाडी, खडकी श्‍वेता चंदनशिवे. वय तीस वर्ष. पती, दोन मुलांसमवेत श्‍वेता खडकी रेल्वे स्थानकाजवळील चिखलवाडी वसाहतीत सासू-सासऱ्यांच्या छोट्याशा खोलीत राहतात. दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर प्रेमविवाह झाला. दोन मुले झाली. मोठ्या मुलाला हृदयाचा आजार असल्याचे समजल्यानंतर त्यांच्यावर आभाळ कोसळले. धीरोदात्तपणे उभे राहात त्यांनी अनेक संस्था, समाजाकडून मदत मिळवून मुलाच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली. चालकाची नोकरी करणाऱ्या पतीवर कुटुंबाचा भार पडू लागल्यानंतर त्यांनी एका मॉलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम सुरू केले. पुढे दुसऱ्या मॉलमध्ये सेल्समन म्हणून आठ वर्षे काम केले. तिथे मिळणाऱ्या दहा हजार रुपयांत मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा खर्च व कर्जपाणी फेडता येत होते.(Shweta trapped in a maze of family survival due to lockdown)

मार्च २०२० मध्ये कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाउनमध्ये मॉल बंद पडला. श्‍वेता यांचा हातातोंडाचा घास हिरावला गेला. बेरोजगारीचे आभाळ कोसळल्यानंतर आता जगायचे तरी कसे, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे पडला.

 श्‍वेता चंदनशिवे
राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांना अटक आणि सुटका

घरात बसून उपयोग नाही. कुटुंबाला किमान दोन वेळेला पोटाला अन्न मिळेल म्हणून श्‍वेता यांनी साठविलेल्या थोड्याफार पैशातून मासे विक्री सुरू केली. परंतु, त्यासाठी लागणाऱ्या बर्फ, कंटेनरच्या अभावामुळे मासे खराब होऊ लागले. उधारीवर तरी किती दिवस माल घेणार? शेवटी नुकसान सोसून तो व्यवसाय त्यांनी बंद केला. २०२० च्या जूनमध्ये लॉकडाउन उठल्यावर पुन्हा मॉल सुरु होईल, पुन्हा नोकरी मिळेल, अशी आशा त्यांना होती.

मॉल सुरू होणे, दूरच याउलट मार्च २०२१ मध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे लॉकडाउन लागला. आता मात्र श्‍वेता हतबल झाल्या. त्यांनी स्वतःचे दागिने मोडले. थोडे कर्ज काढत जमविलेल्या भांडवलातून भाजीचा व्यवसाय सुरु केला. दोन्ही मुले, आई व मावशीकडे ठेवून पहाटे तीन वाजता मोशी मार्केटला जायचे, तेथून भाजीपाला आणून विक्रीसाठी ठेवायचा. तोपर्यंत ११ वाजायचे. दोनशे रुपये मिळेपर्यंत दुकान बंद करावे लागायचे. पालेभाज्या, फळभाज्या नाशवंत असल्यामुळे नफ्यापेक्षा पुन्हा एकदा तोटाच पदरी पडू लागला.

 श्‍वेता चंदनशिवे
''राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील छोटासा पक्ष''

सांगा, कसे जगायचे?

लॉकडाउनमधील वेळेच्या बंधनामुळे भाजी विक्रीतूनही पैसे मिळत नव्हते. सकाळी आणलेली भाजी दुपारपर्यंत विकली नाही, तर ती खराब होऊन टाकून देण्याशिवाय पर्याय नसायचा. त्यामुळे नफा तर दूरच, पण गुंतवलेले भांडवलही निघत नाही. एकदा तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोन-अडीच हजार रुपयांचा भाजीपाला, वजनकाटे, टोकऱ्या उचलूननेल्या. आता सांगा कसे जगायचे आम्ही, श्‍वेता यांचा प्रश्न निरुत्तर केल्याशिवाय राहत नाही.

''कोरोनाने आमच्या पोटावर पाय दिला. माझी नोकरी गेली. काम नसले, तरी जगण्यासाठी पोटाला अन्न लागतेच की. आता दररोज अन्न आणायचे तरी कुठून. मासे, भाजीचा व्यवसाय केला; पण दोन पैसे मिळण्याऐवजी डोक्‍यावर कर्ज वाढले आहे. एकीकडे जगायचे कसा, असा प्रश्‍न असताना आता कर्ज कसे फेडायचे हा प्रश्‍न आहे. कोरोनाने आमची आतडी पिळवटलीत साहेब.''

- श्‍वेता चंदनशिवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.