पारगावचा सिद्धेश थोरात टिव्हीवर 'झळकला' , या मालिकेत ठरला विजयी

Siddhesh Thorat: सिद्धेश थोरात ने मिळवलेल्या या यशाबद्दल पारगाव ग्रामपंचायत कार्यालयात हस्ते सत्कार करण्यात आला.
पारगावचा सिद्धेश थोरात झळकला टिव्हीवर, या मालिकेत पटकवला दमदार विजय
Siddhesh Thorat won in star pravah sakal
Updated on

Pune Latest Update: आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील सिद्धेश रामदास थोरात हा नवोदित कलाकार स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार जोडी नं.१ मध्ये उपविजेता ठरल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.

मी होणार सुपरस्टार जोडी नं.१ या शो च्या जुन मध्ये झाले अंतिम फेरीत सिद्धेश थोरात व ऋतिका जमादार ची जोडी उपविजेती ठरली आहे. त्यांना सन्मानचिन्ह व चार लाख रुपयांचा धनादेश बक्षीस देण्यात आले. सिद्धेश थोरात ने मिळवलेल्या या यशाबद्दल पारगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्वेता ढोबळे व उपसरपंच नितीन ढोबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पारगावचा सिद्धेश थोरात झळकला टिव्हीवर, या मालिकेत पटकवला दमदार विजय
Siddesh Sakore : केंदूरचा सिद्धेश साकोरे ठरला ‘लँड हिरो’;जमिनीचा पोत सुधारल्याबद्दल ‘यूनो’कडून जर्मनीत सन्मान

यावेळी माजी सरपंच बबनराव ढोबळे, संतोष लबडे, काळूराम लोखंडे, विवेक चव्हाण, सुरेखा ढोबळे, लता ढोबळे, गणेश ढोबळे, भाऊसाहेब ढोबळे, अशोक धोब्लेर, निखील दातखीळे, प्र्साद्धोब्ले, संतोष बढेकर, तुषार थोरात, स्वाती भूमकर, मनीषा ढोबळे, मंगळ ढोबळे, ग्रामसेवक के.डी. भोजणे आदी उपस्थित होते.

सिद्धेशने बीसीए मध्ये पदवी संपादन केल्यानंतर नृत्य कलेत आवड असल्याने त्याने क्लासिकल भरत नाट्यम शिकला लावणी किंग आशिष पाटील यांच्या चंद्रा गाण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला अमृता खानविलकर यांनी सिद्धेश बरोबर चंद्रा गाण्यावर नृत्य करून बनवलेल्या रील ला इन्स्टाग्राम वर लाखो चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

पारगावचा सिद्धेश थोरात झळकला टिव्हीवर, या मालिकेत पटकवला दमदार विजय
Pooja Sawant: थाटामाटात पार पडला कलरफुल पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा; लूकनं वेधलं लक्ष

सिद्धेश ने सहभाग घेतलेल्या ग्रुप ला थायलंड मध्ये झालेल्या आयआयजीएफ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळाळे आहे.

सिद्धेश मुलगा असुनही लावणीवर उत्कृष्ठ नृत्य करतो विठाबाई यांच्या लावणीवरील नृत्यासाठी सिद्धेश व ऋतिका या जोडीला प्रसिध्द नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर यांनी मानाचे गुरुचे घुंगरू देऊन चे विशेष कौतुक केले होते.

पारगावचा सिद्धेश थोरात झळकला टिव्हीवर, या मालिकेत पटकवला दमदार विजय
एनडीएतून निवड झालेला दौंड तालुक्यातील पहिला छात्र सिद्धेश खळदेचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com