पुणे - 'सावित्रीच्या लेकी भीतीच्या छायेत', 'लेकींना न्याय द्या, बलात्काऱ्यांना फाशी द्या', 'स्त्री रक्षणाची आस धरा, नाहीतर खुर्ची खाली करा', 'फक्त पैसे नको, संरक्षण हवे, सशक्तीकरणाचे धोरण हवे' असे फलक झळकावत, काळ्या फिती लावून महाविकास आघाडी व घटक पक्षातील हजारो तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा 'मूक आंदोलन'द्वारे निषेध नोंदविला. तिन्ही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राज्यात महिलांच्या सुरक्षिततेची शपथ घेत महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार शनिवारी व्यक्त केला.