Asian Championship Wrestling - १९ : भारत देशाचे प्रतिनिधित्व करत १७ वर्षांखालील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या धनकवडी गावचा सुपुत्र मल्ल पै.धनराज भरत शिर्के याचे समस्त धनकवडी करांच्या वतीने भव्य विजयी मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात आला. ही मिरवणूक शरदचंद्र पवार बहुउद्देशीय हॉल गुलाब नगर येथील जयनाथ तालीम संघ पासून पै.धनराजच्या राहत्या घरी तानाजी नगर परिसरापर्यंत काढण्यात आली.
या मिरवणुकीत अनेक राजकीय,क्रीडा,शैक्षणिक,क्षेत्रातील मान्यवर तसेच असंख्य धनकवडीकर सहभागी होते.मिरवणूक चालू असताना खासदार सुप्रिया सुळे याही मिरवणुकीत सामील झाल्या त्यांनी धनराजच्या या यशाचे कौतुक करत त्याचा सत्कार केला.
तसेच तानाजी नगर परिसरात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात अनेक मान्यवरांनी धनराजचे कौतुक केले.धनकवडी परिसराचे माजी सरपंच तात्यासाहेब भिंताडे यांनी या खेळासाठी लागणारे कष्ट,सातत्य आणि आर्थिक पाठबळाची माहिती देताना धनराजला भविष्यातील वाटचालीसाठी सर्वांना
सदिच्छासोबत आर्थिक पाठबळ देण्याची मागणी केली. आणि सर्व मान्यवरांनी धनराजला पुढील कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचीही ठरविले. यावेळी धनकवडी परिसरात सर्व मंडळे,राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रातील धनकवडीकरांच्या हस्ते पै.धनराजला ट्रॉफी आणि शाल देऊन त्याचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन रेवणनाथआण्णा दारवटकर, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर,शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब रेणुसे, धनकवडीचे माजी सरपंच तात्यासाहेब भिंताडे,शंकर महाराज मठ समितीचे माजी अध्यक्ष भगवान खेडेकर,माजी नगरसेवक विशाल तांबे,
माजी नगरसेविका वर्षा तापकीर,अश्विनी भागवत,युवराज बेलदरे, संतोष रेणूसे, युवराज रेणुसे,चेतन मांगडे,अभिषेक तापकीर,सचिन बदक कुस्ती क्षेत्रातील हिंदकेसरी पै.योगेश दोडके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते,वस्ताद पै.गोविंद पवार, पै.सुनील बापू लिम्हण,जवाहर कुस्ती संकुल भोरचे वस्ताद सुनील शेटे, उपमहाराष्ट्र केसरी राजाभाऊ मोहळ,भोरचे नगरसेवक गणेश पवार हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जय महाराष्ट्र मित्र मंडळ,अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, जयनाथ तरुण मित्र मंडळ,तसेच जयनाथ तालीम संघ वस्ताद आणि माजी नगरसेवक किशोर धनकवडे तसेच समस्त धनकवडी करांच्या वतीने करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.