Pune Traffic News : अरिजित सिंहच्या कॉन्सर्टमुळे रस्ते जाम! पुणेकरांना सहन करावा लागला मनस्ताप

Pune Traffic News : प्रसिध्द गायक अरिजीत सिंग याची पुण्यातील सूस येथील तीर्थ फिल्ड येथे लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे.
singar Arijit Singh concert creates traffic jams at Mahalunge pune traffic news
singar Arijit Singh concert creates traffic jams at Mahalunge pune traffic news
Updated on

औंध : प्रसिध्द गायक अरिजीत सिंग याची पुण्यातील सूस येथील तीर्थ फिल्ड येथे लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे. मात्र या कॉन्सर्टचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागल्याचा प्रकार समोर आला. (Pune Traffic News)

या लाइव्ह कॉन्सर्टला आलेल्या प्रेक्षकांच्या वाहनांमुळे महाळुंगे बाणेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सूस-महाळुंगेच्या हद्दीवर असलेल्या तिर्थ फिल्ड येथे या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पुणे शहरासह, मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक चारचाकी वाहनांनी आले होते. एकाचवेळी रस्त्यावर चारही बाजूंनी वाहने एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

singar Arijit Singh concert creates traffic jams at Mahalunge pune traffic news
Elvish Yadav Arrested : बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला 14 दिवसांची पोलीस कोठडी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

विशेष म्हणजे बरेचजण गुगल मॅपचा वापर करुन आले होते त्यामुळे गुगल मॅपवरुन चुकीच्या दिशेने आल्यामुळे बहुतांश वाहने इच्छितस्थळी न जाता महाळुंगे गावाकडे आल्यामुळे वाहनांची गर्दी झाली.

परिणामी महाळुंगे पोलीस चौकी, राधा चौक, सदानंद चौक, महामार्गावर बिटवाईज चौकाच्या विरुद्ध बाजुला मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची कोंडी बघायला मिळाली. आयोजकांकडून दिशादर्शक फलक न लावल्याने प्रेक्षकांसह स्थानिक नागरिकांना कोंडीत अडकून मनस्ताप सहन करावा लागला.

singar Arijit Singh concert creates traffic jams at Mahalunge pune traffic news
Baramati Lok Sabha 2024: "शरद पवारांचा पराभव करायचा, इतना काफी है..."; चंद्रकांत पाटलांनी दंड थोपटले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()