Diwali Festival : दिवाळीनिमित्त सिंहगडावर विद्युत रोषणाई

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या परिवाराकडून आयोजन
Diwali Festival : दिवाळीनिमित्त सिंहगडावर विद्युत रोषणाई
Updated on

खडकवासला : सिंहगडावर विद्युत रोषणाई करण्याची सुरवात दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी १३ वर्षांपूर्वी केली होती. यंदा पुन्हा त्यांच्या परिवाराकडून दिवाळीच्या निमित्ताने विद्युत रोषणाई केली आहे. काल शनिवारी त्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज रविवारी संध्याकाळी ही रोषणाई नागरिकांच्या साठी खुली असणार आहे.

अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून दीपावलीचा मांगल्याचा हा सण ओळखला जातो. आनंद आणि उत्साहाने असे सण साजरे करतो. सह्याद्रीतील गडकिल्ले महाराष्ट्राचे सांस्कृतीक वैभव व आभुषणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या असंख्य लढवय्या शिलेदारांचे पराक्रमाचे- शौर्याचे प्रतीक समजल्या जाणार्या गडकिल्ल्यांचे आणि मावळ्यांचे स्मरण या निमित्ताने होत असते. दिवाळी आणि किल्ले तयार करणे ही एक परंपरा झाली आहे. या पार्श्वभूमीवर गडकोटावर दीपोत्सव साजरे करण्याची सुरवात झाली आहे.

शहराच्या जवळचा आणि खडकवासला मतदारसंघातील सिंहगड हा किल्ला माझ्या वांजळे कुटुंबासाठी आणि परिवारासाठी कायमच प्रेरणास्थान आहे. माझे वडील रमेश वांजळे हे नेहमीच या गडाचे विकासाठी प्रयत्नशिल राहिले होते. सामाजिक जीवनात कार्य करताना आणि जीवनाची वाटचाल करताना आई हर्षदा वांजळे, चुलते शूक्राचार्य वांजळे, भाऊ मयूरेश वांजळे यांना सिंहगड खर्या अर्थाने प्रेरणाच देतो.

असे सांगून माजी नगरसेविका सायली वांजळे म्हणाल्या, 'साधारण १३ वर्षांपुर्वी १ मे या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित सिंहगडाला भव्य विद्युत रोषणाई केली होती. त्यांच्या या कार्याची आठवण ठेऊन यंदा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असल्याने ही रोषणाई केली आहे.'

नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रम आणि बलीदानाचे स्मरण म्हणुन दीपावलीच्या या आनंदमय उत्सव काळात यंदा सिंहगडाचे पुणे दरवाजा व लगतच्या परिसराला विद्युत रोषणाई करण्याचा हा संकल्प केला. राज्य पुरातत्व विभाग पुणेचे सहाय्यक संचालक विलास वाहणे, पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील, घेरा सिंहगडच्या सरपंच मोनिका पढेर, उपसरपंच गणेश गोफणे, तसेच महावितरण,

हवेली पोलिस या शासकीय विभागाचे आणि वनसंरक्षण समिती घेरा सिंहगड व स्थानिक ग्रामस्थांचे आमच्या या स्तुत्य उपक्रमासाठी चांगले सहकार्य लाभलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे, शुक्राचार्य वांजळे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित केला आहे. असे ही वांजळे यांनी सांगितले.

गडकिल्ले हा एक अमुल्य ठेवा आहे. तो नव्या पिढीचे मनात रुजविण्यासाठी आपण सण- उत्सव साजरे करत असताना आपण शिवराय आणि त्यांच्या सहकारी- पराक्रमी मावळ्यांचे स्मरण करून गडसंवर्धनाचे कार्य हाती घेतले पाहीजे. असे आवाहन देखील त्यांनी या निमित्ताने केले आहे.

- सायली वांजळे, माजी नगरसेविका पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()