Pune Accident : सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटली; 10 ते 12 पर्यटक जखमी

या दुर्घटनेमुळे सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन व नियमनाचा प्रश्न ऐरणीवर
sinhagad ghat road jeep accident 10 to 12 tourist injured police hospital pune marathi news
sinhagad ghat road jeep accident 10 to 12 tourist injured police hospital pune marathi newsSakal
Updated on

सिंहगड: सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटून दहा ते बारा पर्यटक जखमी झाल्याची घटना सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी पर्यटकांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वन विभाग व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या दुर्घटनेमुळे सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन व नियमनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिंहगड घाट रस्त्यावरील अकरा हजार वळणाजवळ बारा ते पंधरा पर्यटक घेऊन गडावरुन खाली येत असलेली जीप उलटली.

या अपघातात काही पर्यटकांना जास्त तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. इतर पर्यटक व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच सकाळी सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गडावर घेऊन आलेल्या जीपचाही गाडीतळाजवळील तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला.

यात एक मुलगी जखमी झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुदैवाने ब्रेक निकामी झालेली जीप कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या दोन अपघातांमुळे कालबाह्य झालेल्या व मोडकळीस आलेल्या वाहनांतून सिंहगडाच्या धोकादायक घाट रस्त्यावर सुरू असलेल्या जीवघेण्या प्रवासी वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आरटीओ व पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष....... सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन कारवाई करण्याबाबत दोन वेळा आरटीओ व पोलिस प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.

मात्र अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सातत्याने अपघात होत असताना व पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला असताना संबंधित प्रशासन मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

"आज घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांचा वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला आहे. काही पर्यटक जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यासंदर्भात दोन वेळा आरटीओ व पोलिस प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. पुन्हा पत्र देऊन कारवाईची मागणी करण्यात येणार आहे."

- बळीराम वायकर, वनरक्षक, सिंहगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.