Sinhagad Road Flyover : सिंहगड रस्ता उड्डाणपुलाची आयुक्तांकडून पाहणी

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे.
sinhagad road flyover
sinhagad road flyoversakal
Updated on

पुणे - सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले. नागरिकांकडून हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी केली जात असतानाही अद्याप वाहतूक बंद आहे. याच पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. मात्र, पूल खुला करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे. यामध्ये राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. शेवटचा एक डांबराचा थर राहिलेला आहे. पण गेल्या दोन आठवड्यापासून पावसाची संततधार सुरु आहे. खडी ओली असल्याने डांबराचा प्लांट बंद आहेत, तसेच पावसात डांबरीकरण करणे शक्य नसल्याने हा डांबराचा थर मारता आला नाही असा दावा प्रकल्प विभागाकडून केला जात आहे.

दरम्यान या उड्डाणपुलावरील विद्युत व्यवस्था, रंगकाम, दिशादर्शक फलक लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. कॅट आइज, रस्त्यावर पट्टे मारणे असे किरकोळ काम शिल्लक आहे. हा उड्डाणपूल सुरु करावा अशी मागणी स्थानिक नागरिक, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे उद्‍घाटन करायचे असल्याने हा पूल नागरिकांसाठी खुला केला जात नसल्याचा आरोपही विरोधकांनी यापूर्वी केला आहे.

महापालिका आयुक्तांनी आज सकाळी या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ५० मिमीचा थर मारण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. तसेच हा थर न मारता पुलाचा वापर करता येईल का याबाबतची माहिती घेतली. पण त्याचा अंतिम निर्णय झालेला नाही, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

पावसाळ्यानंतरही थर मारणे शक्य

५० मिमीचा डांबराचा थर पावसात मारल्यास रस्ता लगेच खराब होऊन खड्डे पडू शकतात. त्यामुळे महापालिकेवर नागरिक लगेच टीकेची झोड उठवतील. त्यामुळे हे काम केले जात नाही. पण पाऊसही थांबत नसल्याने खडी ओली असल्याने प्लांट बंद आहेत. त्यामुळे आत्ता उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करून देऊन पावसाळ्यानंतर डांबराचा थर मारणेही शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.