पुणे : पादचारी मार्गावर तब्बल ७८ लाखांचे शिल्प उभारणी सुरु

सिंहगड रस्त्यावर राजाराम पुल येथे पादचारी मार्गावर तब्बल ७८ लाख रुपये खर्च करून नरवीर तानाजी मालुसरे यांचे शिल्प उभारले जाणार आहे.
Sinhagad Road
Sinhagad RoadSakal
Updated on

पुणे : सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) नागरिक आधीच वाहतूक कोंडीने बेजार असताना आता राजाराम पुल (Rajaram Bridge) येथे पादचारी मार्गावर तब्बल ७८ लाख रुपये खर्च करून नरवीर तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांचे शिल्प उभारले जाणार आहे. धक्कादायक म्हणजे कामाची वर्क ऑर्डर देण्यापर्वीच ठेकेदाराने काम सुरू केले. तसेच या शिल्पास कला संचालनालयाने मान्यता मिळालेली नाही.

सिंहगड रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, या रस्त्यावरील पादचारी मार्ग, सायकल मार्गावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यातच आता या रस्‍त्यावर उड्डाणपूलाचे काम सुरू झाले असून, पुढील किमान तीन वर्ष हे काम चालणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागणार आहे.

Sinhagad Road
आळेफाटा : पिस्तूल व काडतूस विकायला आलेल्यांना पोलिसांनी केले जेरबंद

राजाराम पुलाच्या चौकात सिंहगड रस्त्यावर पादचारी मार्गावर हे ७० फूट लांब आणि सुमारे ३० फूट ऊंचीचे तानाजी मालूसरे यांच्या जीवन प्रसंग दाखविणारे सात शिल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी जीएसटीसह ७८ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. शुभम कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने वर्क आॅर्डर मिळण्यापूर्वीच गेल्या आठवड्यापासून काम सुरू केले आहे. पादचारी मार्ग खोदून रस्त्याच्या बाजूने हिरव्या रंगाचे कापड लावून आतमध्ये काम सुरू केले आहे. हे शिल्प योग्य आहे की नाही हे तपासून परवानगी दिली जाते, पण कला संचालनालयाने त्याची तपासणी केलेली नाही.

कार्यकारी अभियंता अमर शिंदे म्हणाले, ‘‘तानाजी मासुलरे यांच्या जिवनावरील शिल्प करण्यास स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे, पण अद्याप वर्क आॅर्डर दिलेली नाही. कला संचालनालयाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. याठिकाणी पादचाऱ्यांसाठी दोन मिटर जागा ठेवली आहे.

Sinhagad Road
विजयस्तंभ अभिवादनानिमित्त पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

नगरसेवक श्रीकांत जगताप म्हणाले, ‘‘कला संचलनालय आणि वर्क आॅर्डर मिळे ल. पण हे काम त्याच ठेकेदाराला मिळाल्याने काम सुरू केले आहे. या कामामुळे पादचाऱ्यांना कोणताही अडथळा होणार नाही. या शिल्पामुळे नव्या पिढीला इतिहास कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.