सिंहगडावर इ- व्हेईकल आणि गाईड व्यवस्था सुरू करणार; सुप्रिया सुळे

स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन 'गाइड' म्हणून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सिंहगडावर इ-व्हेइकलचा वापर
Supriya Sule
Supriya SuleSakal
Updated on

खडकवासला - स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन 'गाइड' म्हणून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, सिंहगडावर इ-व्हेइकलचा वापर करणे, गडावरील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देणारे फलक उभारणे, स्वच्छता मोहिम राबवणे यासह परिसरातील वनसंपदेत आणखी भर घालणे आदी विषयांवर आज शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत पुण्यातील विधानभवन येथे झालेल्या बैठकीत चर्चा केली.

पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात यावी. पर्यटकांना पिठलं- भाकरीसारखे स्थानिक व्यंजन उपलब्ध द्यावेत. त्या विक्रेत्यांना गडाच्या परिसरात दोन तीन ठिकाणी एकत्र व्यवस्था करणे, विकास कर्तन किल्ल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही. याची दक्षता घ्यावी. असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी दिले आहेत.

विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राहूल पाटील, माजी उपमहापौर नगरसेवक दिलीप बराटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, नगरसेवक सचिन दोडके, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, माजी सरपंच सुरेश गुजर यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी या बैठकीला उपास्थित होते.

मागील आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंहगडाला भेट दिली होती. त्यावेळी गडाच्या संवर्धन व पर्यटनाचा दर्जा वाढविण्यासाठी काय करता येईल, नव्याने काही उपक्रम राबवता येतील का, याबाबत त्यांनी गड परिसरातील नागरिकांशी चर्चा केली होती. त्यानुसार त्यांनी आज शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही उपक्रम राबवता येतील, असा प्रस्ताव मांडला.

त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. सिंहगड किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे . येथे विविध सोयीसुविधा करणे आवश्यक आहे. किल्ले सिंहगड परिसराचा विकास करताना येथील पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाचा वारसा जपणार असून पर्यावरण, पुरातत्व विभागाशी अनुरूप असा विकास करावा. त्यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींची पुनर्रचना करणे, पर्यटकांची सोय लक्षात घेऊन विविध उपाययोजना करणे आणि वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्थानिक विक्रेत्यांना दोन- तीन ठिकाणी एकत्र व्यवस्था, या स्थानिक विषयाकडे खासदार सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. त्यानुसार सिंहगड किल्ला व पर्यटन विकासाच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गडावर प्रदूषण होऊ नये. यासाठी इ- व्हेईकलचा वापर करणे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा अवगत असलेल्या स्थानिक नागरिकांना गाईड म्हणून नेमणूक केल्यास त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. असे सुळे यांनी सांगितले. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.