Pune Crime : सिंहगड रस्ता परिसरात बांबू आणि दगडाने बेदम मारहाण करून तरुणाचा खून

एका तरुणाला बांबू आणि दगडाने बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
Beating
Beatingesakal
Updated on

पुणे - एका तरुणाला बांबू आणि दगडाने बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य संतोष घोरपडे (वय-२१ , रा. घोरपडे चाळ, गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश परदेशी आणि सुरेश शुक्ला या संशयितांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आदित्यच्या आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य मित्रासमवेत नऱ्हेतील एका बारमध्ये दारू पिण्यास गेला होता. जेवण करीत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर धायरी रस्त्यावरील एका किराणा दुकानासमोर मध्यरात्री आकाश आणि त्याच्या मित्रांनी आदित्यला बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.