पुणे : सिंहगडावरील पर्यटक निवास राहण्यासाठी खुले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
sinhgad fort
sinhgad fortsakal
Updated on

खडकवासला : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा (MTDC) च्या सिंहगडावरील (sinhgad) जुन्या बंगल्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. एकावेळी साधारणपणे ३५ पर्यटकांची सोय या ठिकाणी करण्यात आली असुन रुचकर भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या जिल्हात कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव संपल्यावर हे पर्यटन निवासस्थान पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. अशी माहिती पर्यटन विभागाने दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chatrapati shivaji maharaj) पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि नरवीर तानाजी मालुसरे (tanaji malusare) यांच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या सिंहगडावरील पर्यटन निवासस्थानाचे उद्घाटन मंगळवारी मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे झाले. त्यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (abalsaheb thorat), पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thakceray, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे (adity tatkare), मंत्रालयातील व पर्यटन खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंहगडावरील हा बंगला पूर्वी रेव्हेन्यू वेल्फेअर असोशिएशनचा साधा बंगला होता. त्याच्या खोल्या देखील सध्या होत्या. यापूर्वी हा पूर्वी बंगला भाडेतत्वावर दिला होता. आता त्याचे नूतनीकरण केले आहे. पर्यटनची ३२ गुंठे जागा आहे. या जागेवर महामंडळाकडुन पर्यटक निवास बांधण्यात आले होते. राज्य सरकारच्या पर्यटनच्या नवीन धोरणानुसार पर्यटक निवासाची दुरुस्ती आणि श्रेणीवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, पर्यटक निवासांची कामे महामंडळाने केली आहेत.

या पर्यटक निवास इमारतीची श्रेणीवाढ करताना अस्तित्वातील इमारती मध्येच दोन सुट, एक व्हीआयपी सुट, एक लोकनिवास (डॉरमेटरी), व्यवस्थापक कक्ष, उपहारगृह आणि डायनिंग यांची सुविधा केली आहे. दोन सुट, व्हीआयपी सुट वातानुकुलीत केला आहे. सुटमध्ये आकर्षक सिलींग, आधुनिक फर्निचर बनविले असून आधुनिक स्वच्छतागृह केले ठिकाणी महीला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी अशा दोन लोकनिवासा(डॉरमेटरी)ची सोय आहे. एका वेळी प्रत्येकी आठ पर्यटक येथे राहण्याचा आनंद घेवु शकतात. पर्यटक निवासाच्या सुरक्षेसाठी दगडी संरक्षक भिंत बांधली आहे.

ऑनलाईन बुकिंग होणार

पर्यटक निवास गडावरील हवा पॉईंट जवळ हे आहे. सिंहगड पर्यटक निवास बुकिंग www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावरून करता येणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर हे पर्यटन निवासस्थान पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी ओपन ॲम्पीथिएटरही आहे. ठिकाणी विविध ग्रुपकडुन मर्दानी खेळ आणि कला यांचे आयोजन आगामी काळात करण्यात येणार आहे.

-दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, पुणे

सिंहगड पर्यटक निवास सोयीसुविधा

  • एकुण परिसर उपलब्ध जागा - 32 गुंठे.

  • निवासी खोल्या (ए.सी.) - 2 सुट.

  • व्हीआयपी (ए.सी.) - 1 सुट.

  • डॉरमेटरी (लोकनिवास - महीला) - (8 बेडेचा)

  • डॉरमेटरी (लोकनिवास - पुरुष) - (8 बेडेड)

  • तंबुनिवास -3 युनिट (प्रस्तावित)

  • रेस्टॉरंट –1 युनिट

  • डायनिंग –1 युनिट

  • स्वागतकक्ष – 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.