पुणे - मालमत्तेच्या वादातून बहिणीचा खून करून तिचे हात, पाय आणि डोके धडापासून वेगळे केले. त्यानंतर तिचा मृतदेह संगम पुलावरून नदीपात्रात फेकल्याची कबुली खून झालेल्या महिलेचा भाऊ व त्याच्या पत्नीने दिली आहे..शकीना ऊर्फ शकिला अब्दुल खान (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचा भाऊ अश्पाक अब्दुल खान (वय ५१) आणि त्याची पत्नी हमीदा खान (वय ४५, तिघे रा. भैय्यावाडी, शिवाजीनगर झोपडपट्टी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शकिना यांच्या काकांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींनी २६ ऑगस्टला त्यांच्या घरात शकिना यांचा खून केला होता.शकिना यांचे हात, पाय आणि डोके अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. पोलिस आरोपींना घटनास्थळी तेथे नेऊन शोधकार्य राबविणार आहे. तसेच त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करणार आहेत. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना सोमवारी (ता. ९) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते..आरोपींनी संपत्तीच्या वादातून हा गुन्हा केला असून, खून झालेल्या महिलेचे अवयव अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे आरोपींना पुन्हा नदीपात्रात नेऊन शोधकार्य राबवायचे आहे. आरोपींनी मृत महिलेच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेला कोयता व कुऱ्हाड कोठून आणले, त्यांना आणखी कोणी मदत केली, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपींच्या पोलिस कोठडीत १२ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.