दरोड्याच्या गुन्ह्यात सहा आरोपींना दहा लाखांचा दंड, आठ वर्ष तुरुंगवास

Six accused have been sentenced to eight years in jail for robbery
Six accused have been sentenced to eight years in jail for robbery
Updated on

पुणे : कुख्यात मुकणे टोळीच्या सहा सदस्यांना दरोड्याच्या गुन्ह्यात मोक्कानुसार आठ वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा येथील न्यायालयाने आज सुनावली. विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

अर्जुन सीताराम हिलम, बाबू कान्हू वाघमारे, मनोहर सीताराम हिलम, विष्णू जानकु वाघमारे, नारायण भागा जाधव, शांताराम बाळू मुकणे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे. सरकारी वकील विजय फरगडे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. तर लोणावळा विभागाचे पोलिस उपअधीक्षक वैभव कलबुर्मे आणि सहायक पोलिस निरीक्षक एस. निंबाळकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. ऍड. फरगडे यांनी 14 साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध करताना चोरलेल्या रकमेची वसुली आणि ओळख परेड महत्त्वाची ठरली.

आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलिस ठाण्यात कलम दरोडा आणि मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने सदर प्रकरणात आरोपींना दरोड्याच्या गुन्ह्यानुसार दोषी धरून त्यांना प्रत्येकी आठ वर्ष व दोन हजार रुपये दंड शिक्षा सुनावली. तर मोक्का कलम 3 (1) मध्ये दोषी धरून प्रत्येकी आठ वर्ष कैद, पाच लाख रुपये दंड आणि दंड न दिल्यास 12 महिने सक्तमजुरी व मोक्का कलम 3 (4) नुसार दोषी धरून प्रत्येकी आठ वर्ष कैद व पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावणी. तर या सदर गुन्ह्यातील इतर चार आरोपींना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.