Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर टँकर-इर्टिगाच्या धडकेत सहा जण जखमी; वाहनाचा चक्काचूर

महामार्गाच्या दुभाजकातील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला भरधाव येणारी इर्टिगा गाडी पाठीमागून धडकल्याने सहा जण जखमी झाले.
Pune-Solapur National Highway
Pune-Solapur National Highwayesakal
Updated on
Summary

हा अपघात झाडांना पाणी घालणाऱ्या टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.

कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) दौंड तालुक्यातील खडकी येथे महामार्गाच्या दुभाजकातील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला भरधाव येणारी इर्टिगा गाडी पाठीमागून धडकल्याने सहा जण जखमी झाले. अपघातात इर्टिगाच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात मंगळवारी (ता.२८) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.

हा अपघात झाडांना पाणी घालणाऱ्या टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. दौंड तालुक्यातील खडकी येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर दुभाजकामधील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला इर्टिगा गाडी (एमएच.१४,एलबी.७०७१) पाठीमागून धडकली. ही गाडी सोलापूरकडून पुण्याकडे जात होती. या अपघातात इर्टिगा गाडीचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून त्यामधील सहा प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाहीत.

Pune-Solapur National Highway
Radhanagari Crime : पेरणीच्या वादातून मुलाने आईच्या डोक्यात खोरे मारून केला खून; घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता

या जखमींना भिगवण (ता. इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात झाडांना पाणी घालणाऱ्या टँकर चालका पाठीमागे रिफ्लेक्टर लावण्याचा निष्काळजीपण केल्यामुळे अपघात घडल्याची माहिती अपघातस्थळी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी दिली. अपघात झाल्यानंतर माहिती देऊनही महामार्गाची रुग्णवाहिका व संबंधित कर्मचारी एक तास उलटूनही घटनास्थळी आले नव्हते. याबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. झाडांना पाणी घालत असता टँकर पासून काही अंतरावर रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे. या रिफ्लेक्टरमुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढे वाहन असल्याचे लक्षात येते. त्यामुळे अपघात टाळतात.

Pune-Solapur National Highway
धक्कादायक! हातकणंगलेतील 32 वर्षीय महिलेचा गर्भपात करताना मृत्यू; दाखल्यासाठी सांगलीत मृतदेह फिरवला अन्...

पुणे सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून जाणारे व येणारी स्वतंत्र दुपदरी लेन असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग खूप असतो. त्यामुळे महामार्गावर नादुरुस्त झालेली वाहने त्वरित बाजूला काढणे किंवा त्या वाहनापासून लांब अंतरावर रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा महामार्गालगतच्या गावांमधील ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.