पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत २१ पैकी सहा बिनविरोध

जिल्हा बॅंकेवर बिनविरोध झालेले दोन्ही मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर, दोन्ही आमदार कॉंग्रेसचे आहेत
election
electionsakal
Updated on

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारपर्यंत (ता. ९) २१ पैकी सहा जण बिनविरोध झाले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांसह, दोन आमदार आणि अन्य दोघा जणांचा समावेश आहे.

जिल्हा बॅंकेवर बिनविरोध झालेले दोन्ही मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर, दोन्ही आमदार कॉंग्रेसचे आहेत. भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांचा बिनविरोध झालेल्या दोन आमदारांमध्ये समावेश आहे. वेल्हे तालुक्यातील रेवणनाथ दारवटकर आणि मावळ तालुक्यातील माऊली दाभाडे हे अन्य दोघे जण बिनविरोध झाले आहेत. या निवडीमुळे दारवटकर हे सलग सातव्यांदा जिल्हा बॅंकेचे संचालक झाले आहेत. हे सर्वजण तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून जिल्हा बॅंकेवर निवडले गेले आहेत.

election
तांदुळवाडी ग्रामपंचायत बरखास्तीच्या आदेशाला शासनाकडून स्थगिती!

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. यापैकी प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक, याप्रमाणे १३ तालुक्यात मिळून तेरा जागा आहेत. याशिवाय ब, क आणि ड मतदारसंघातून प्रत्येकी एक, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एक, इतर मागास प्रवर्गातून एक, भटक्या जाती-जमाती प्रवर्गातून एक आणि महिला प्रवर्गातून दोन जागा आहेत. यासाठी सध्या १५९ जण निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना येत्या २२ डिसेंबरपर्यंत माघारी घेता येणार आहे.

या संचालक मंडळाच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये बांधकाम राज्यमंत्री आणि विद्यमान संचालक दत्तात्रेय भरणे, बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, खेडचे आमदार दिलीप मोहिते, शिरूरचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, सविता दगडे, सतीश खोमणे, विश्‍वास देवकाते, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, शरद बुट्टे पाटील आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.