पुणे - कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याचा गोळ्या झाडून खून करणाऱ्या सहा जणांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला.