Pune Crime News: पुण्यातही बदलापूर! चालत्या स्कूलबसमध्ये सहा वर्ष चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

Six-year-old girl sexually assaulted: आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बस मधून शाळेत सोडण्याचे काम करत असतो. या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही पीडित चिमुरडींना पुढच्या सीटवर बसवत असत.
pune crime news
pune crime newsesakal
Updated on

बदलापूरनंतर पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे.  पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटेनमुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील वानवडी परिसरात हा धकादायक प्रकार उघडीस आला.

अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस चालक सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करत होता.

आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बस मधून शाळेत सोडण्याचे  काम करत असतो. या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही पीडित चिमुरडींना पुढच्या सीटवर बसवत असत. आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमरुड्यांना जवळ बसवून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता. या विषयाची वाचता कुठे केली तर धमकी सुद्धा देत असल्याची माहिती समोर आली आहे.

pune crime news
Pune: शाळेच्या प्रशासकाकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट ठिकाणी वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म अल्पवयीन चिमुडीने आपल्या आईला सांगितला यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

pune crime news
Pune Crime : लैंगिक अत्याचार प्रकरणी कराटे शिक्षकास वीस वर्षे सश्रम कारावास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.