‘माझ्या भावाला प्रमोशन मिळालंय ना, मग तुमच्या पोटात दुखणारच.’ श्वेतानं फणकाऱ्यानं म्हटलं. ‘‘अगं खरंच तसं काही नाही. बहुतेक रात्रीचं जेवण पचलं नाही.’
‘अगं डॉक्टरांना फोन करतेस का?
माझ्या पोटात खूप दुखतंय.’ रणजितने श्वेताला अजिजीनं म्हटलं.
‘माझ्या भावाला प्रमोशन मिळालंय ना, मग तुमच्या पोटात दुखणारच.’ श्वेतानं फणकाऱ्यानं म्हटलं. ‘‘अगं खरंच तसं काही नाही. बहुतेक रात्रीचं जेवण पचलं नाही.’ रणजितने कळवळून म्हटलं. ‘तुम्ही मोठमोठ्या थापा सहज पचवता आणि साधं जेवण पचलं नाही, असं सांगता?’ श्वेतानं म्हटलं.
‘अगं खरंच वांग्याच्या भाजीमुळे माझं पोट दुखतंय.’ रणजितने म्हटले.
‘खबरदार! मी केलेल्या भाजीला नावं ठेवली तर! मी केलेली वांग्याची भाजी फेसबुकवर टाकली होती तर दोनशे लाईक आणि दीडशे कमेंट मिळाल्या. माझ्या हातचं खाण्यासाठी लोकं जिवाचा आटापिटा करतात आणि तुम्हाला त्याची कदर नाही.’ श्वेताचं बोलणं ऐकून पुढचं महाभारत टाळण्यासाठी रणजित गप्प बसला.
‘बहुतेक ऑफिसमध्ये मी पिझ्झा खाल्ल्याने पोट दुखत असेल.’’ असा खुलासा त्याने केला. ‘अगं बाई! मी एवढं राब-राबून डबा बनवते आणि तुम्ही तिकडे पिझ्झा-बर्गर खाता. माझ्या कष्टाला काही किंमत आहे की नाही.’ डोळ्यातून पाणी काढत श्वेताने त्याला धारेवर धरले. आता मात्र आगीतून फुफाट्यात पडल्याची जाणीव रणजितला झाली.
‘अगं ऑफिसमधील स्वातीचा वाढदिवस होता. त्यामुळं पिझ्झा खाल्ला. पण ते जाऊ दे. तू पानसे डॉक्टरांना फोन कर ना.’ रणजितने असं म्हटल्यावर तिने त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन म्हणाली, ‘पासवर्ड सांगा.’ त्यावर तो पटकन म्हणाला, ‘जाऊ दे. नको करू फोन. माझी पोटदुखीच पळाली. बाकी काही म्हण. पण तुझ्याशी भांडल्यानंतर पोटदुखीच काय पण मोठमोठे आजारही पळून जातात.’’ मोठ्यानं हसत रणजित म्हणाला. मात्र, हे आपलं कौतुक आहे की टीका आहे, हा संभ्रम तिला पडला. आपला नवरा त्याचा मोबाईल आपल्या हाती लागू देत नाही, हे पाहून तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. रणजित ऑफिसला गेल्यानंतर तिने फेसबुकवर जाऊन स्वाती दाभाडेचं अकाऊंट शोधून काढलं. तिने केलेल्या पोस्टवर आपला नवरा भरभरून कमेंट्स करत असल्याचं पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या दिवसांनंतर ती रणजितवर पाळत ठेवू लागली.
गेल्या सहा महिन्यांपासून रणजित जोडधंदा म्हणून ऑफिस सांभाळून विमा पॉलिसी काढून देण्याचं काम करू लागला होता. चांगलं कमिशन मिळत असल्याने तो खुश होता. ऑफिसमधील अनेकांचा विमा त्याने उतरवला होता. स्वातीनं विमा उतरावा, यासाठी तो लाडीगोडी लावत होता. शेवटी एकदाची ती राजी झाली. तिच्याकडून फॉर्म भरून घेतला व तिचे तीन फोटोही घेतले. ते हरवू नयेत म्हणून खिशात ठेवले. सकाळी कपडे धुवायला टाकताना श्वेताला स्वातीचे फोटो दिसले आणि त्यानंतर तिने कडक लक्ष्मीचा अवतार धारण केला.
‘हे फोटो कोणाचे आहेत?’’ तिने रणजितला जाब विचारला. ‘आमच्या ऑफिसमधील स्वाती दाढेचे.’ रणजितने सांगितले.
‘तिचे फोटो तुमच्या खिशात कसे आले? तिच्या प्रत्येक पोस्टवर तुमची कमेंट कशी असते? तिच्या वाढदिवसाला पिझ्झा खायला कोठं गेला होतात? तुमचं चॅटिंग मी वाचू नये म्हणून मोबाईल माझ्या हाती लागू देत नाही ना?’ श्वेताच्या प्रश्नांच्या फैरीपुढे रणजित ‘ततपप’ करू लागला.
‘अगं विमा पॉलिसीसाठी... ‘एवढंच तो म्हणू शकला.’
‘मला तुमची ‘पॉलिसी’ चांगली माहिती आहे. खरं खरं सांगा, तुमचं हे प्रकरण कधीपासून सुरू आहे.’ स्वातीचा रणचंडिकेचा अवतार पाहून रणजितची चांगलीच भंबेरी उडाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.