स्मार्ट सिटीतील बस थांबे स्मार्ट कधी होणार?अपुरे छत,खुर्च्यांचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त

अपुरे छत,बाकड्यांची दुरवस्था, असल्याने जुनी सांगवी व परिसरातील प्रवासी बसथांब्यावर प्रवाशी नागरिकांना उन,वारा पावसात उभे राहून मिळेल त्या आडोशाचा आसरा घेत प्रवास करावा
smart city bus stops Citizens suffering due to insufficient roofs seating arrreangement
smart city bus stops Citizens suffering due to insufficient roofs seating arrreangement sakal
Updated on

जुनी सांगवी : अपुरे छत,बाकड्यांची दुरवस्था, असल्याने जुनी सांगवी व परिसरातील प्रवासी बसथांब्यावर प्रवाशी नागरिकांना उन,वारा पावसात उभे राहून मिळेल त्या आडोशाचा आसरा घेत प्रवास करावा लागत आहे.यामुळे स्मार्ट नगरांमधून प्रवाशी निवारा स्मार्ट कधी होणार? असा प्रवाशी, नागरिक चाकरमानी मंडळी मधून प्रश्न विचारला जात आहे. सांगवी, पिंपळे गुरव,नवी सांगवी भागात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत रस्ते सिमेंट रस्ते,रस्ते उद्यान,सोसायट्या परिसरातून ओपन जिम ची साधने उपलब्ध करण्यात आली मात्र त्याच धर्तीवर स्मार्ट बसथांबे नसल्याने स्मार्ट उपनगरातील प्रवाशी, नागरिक, विद्यार्थी, चाकरमानी मंडळी यांना रंग उडालेले बस थांबे,अपुरे छत व बाकडे नसलेल्या बसथांब्यावर त्रास सहन करावा लागत आहे.

जुनी सांगवी येथील गंगानगर,वसंत दादा पाटील मुख्य बस थांबा, शितोळे नगर सांगवी फाटा रस्ता आदी परिसरातील बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे.गंगानगर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या सिमेंट पत्रा असलेल्या बसथांब्यावर अपुरे छत आहे.फरशा निघालेल्या आहेत.बाकडे, खुर्च्यांचा अभाव आहे.यामुळे बसथांबा अपुरा पडतो.परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिकांना इतरत्र आडोसा घेत ताटकळत थांबावे लागत आहे.यामागील बाजूस महापालिका रूग्णालय, महापालिका शाळा करसंकलन कार्यालय भाजी मार्केट असल्याने या प्रमुख रस्त्यांवर मोठी वर्दळ असते.मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवासी,नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते.अपु-या सोयी सुविधांमुळे नागरिकांना त्रास सहन करत काम,शाळा गाठावी लागते.

-काय आहेत प्रवाशांच्या मागण्या

  • प्रत्येक बसथांबा सुस्थितीत हवा.

  • बसथांब्यावर बसचे वेळापत्रक असावे.

  • स्वच्छता गृह असावे

स्मार्ट सिटीला साजेसे बसथांबे करण्यात यावेत.जुनी सांगवी व परिसरात अनेक ठिकाणी बसथांब्यांची दुरवस्था आहे.अनेक ठिकाणी प्रवाशी निवारा नाही.

सुजित पोंगडे सामाजिक कार्यकर्ते

जुनी सांगवीतील बसथांबे व आवश्यक ठिकाणी बस थांबा व निवारा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

संतोष कांबळे माजी नगरसेवक

स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका त्या त्या भागात काम करत आहेत.आवश्यक ठिकाणी दुरूस्ती व बसथांबा उपलब्ध करण्यात येईल.

-दत्तात्रय तुळपुळे चिफ इंजिनिअर पीएमपीएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()