धनकवडी : धनकवडीच्या गिर्यारोहक स्मिता घुगे यांनी 'हुंडाविरोधी' नारा देत आफ्रिका खंडातील सर्वोच्च आणि चढण्यासाठी अतिशय अवघड असलेल्या माउंट किलीमांजारो शिखरावर सर्वात मोठा तिरंगा ध्वज फडकवला, ही चित्तथरारक कामगिरी करून स्वातंत्र्यदिनी हे शिखर सर करून इतिहास घडवला आहे.
आपला वेगळा ठसा उमठवणारी ती पहिली भारतीय तरुणी ठरली असून, या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी मार्गदर्शन केले आहे. स्वतंत्र दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि स्मिता घुगे यांनी स्वातंत्र्य दिनी केलेली यशस्वी कामगिरीमुळे धनकवडीकरांनी स्मिता याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.
टांझानिया देशातील माउंट किलीमांजारो हे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर असून, या ज्वालामुखीजन्य शिखराची उंची ५,८९५ मिटर (१९,३४० फूट) आहे. वर्ष भर बर्फाच्छा दिसत असणारे हे शिखर जगभरातल्या गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे. हेच आव्हान पुण्यातल्या धनकवडी येथे राहणाऱ्या गिर्यारोहक स्मिता दुर्गादास घुगे या युवतीने स्वीकारले. '३६० एक्सप्लोरर' या गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून स्मिता घुगे यांनी स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी माउंट किलीमांजरोवर सर्वात मोठा तिरंगा फडकवला.
या मोहिमेविषयी अधिक माहिती देताना स्मिता घुगे म्हणाल्या, मी वंजारी समाजाची आहे, आमच्या समाजात खूप हुंडा घेतला जातो. पण मी हुंडा देणार नाही, असा निश्चय केला आणि तोच खर्च या गिर्यारोहण मोहिमेवर केला. मला या मोहिमेसाठी कोणीही आर्थिक सहकार्य केले नव्हते. मला या मोहिमेवर तब्बल साडेपाच लाख रुपये खर्च आला.
या मोहिमेसाठी आई-वडिलांनी दाखवलेला विश्वास आनंदसरांचे मागदर्शन मुळे माझी उमेद वाढली. मी आयटी कंपनीतील नोकरी सांभाळून तळाजाई टेकडीवर वडिलांसोबत दररोज सराव केला. स्मिता घुगे म्हणल्या की, मी या मोहिमेआधी कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगडचा कोकणकडा सर केला होता. परंतु 'हाय अल्टिट्युड' वरील माउंट किलीमांजारो हे शिखर पूर्ण करण्याचे माझे ध्येय होते.
त्यामुळे मी भर लॉकडाऊनच्या काळात ३६ तास प्रवास करून आम्ही टांझानिया देशात पोहोचलो. प्रचंड उंची 'उणे २९ तापमान' असतानाही हे शिखर सर केले व तेथे ७५ फुटी तिरंगा ध्वज फडकवला. कोणतीही पार्श्वभूमी नसताना, ही कामगिरी यशस्वी केली. मी एक सामान्य मराठी मुलगी असूनही भगवानबाबांच्या आशीर्वादाने हे करू शकले. असे घुगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.