Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?
Updated on

पिंपरी - 'आठ बाय आठ फुटाचे घर. त्यात माणसं सात ते आठ. ना घराला आंगण ना पडवी. बाहेर कोरोनाचा संसर्ग तर घरात असह्य उकाडा. शारिरीक अंतराचे काटेकोर पालन करण्यात अडचणी भेडसावत आहेत. ही बिकट परिस्थिती आहे पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टीवासियांची.

शहरात घोषित 37 व अघोषित 34 झोपडपट्ट्या आहेत. या भागात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे. सध्या शहरात झोपडपट्टीतील नागरिकांची संख्या 1 लाख 47 हजार 810 आहे. कासारवाडीतील हिराबाई, बिजलीनगरमधील नागसेननगर, खराळवाडीतील पॉवरहाउस, वाकडमधील खडकवस्ती, पिंपरीतील गांधीनगर, भाटनगर, इंदिरानगर, चिंचवडमधील अजंठानगर, दळवीनगर, भोसरीतील बालाजीनगर, चिंचवडस्टेशन येथील आनंदनगर हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. घरात अपूरी जागा असल्याने या परिसरातील नागरीक रस्त्यावर रेंगाळताना नजरेस पडत आहेत. त्यातच दोन वेळचा पोटाचा प्रश्‍न तीव्रतेने भेडसावत आहे. त्यामुळे नागरीक सकाळच्या प्रहरीच घराबाहेर अन्नाच्या शोधात निघत आहेत. शिवाय परिसरातील अस्वच्छता. घरासमोरुनच उघडे नाले वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

झोपडपट्टीतील मजूर पूर्वी कामावर जात तेव्हा जिथे जागा मिळेल तिथे आसरा घेत असत. अन्यथा घराच्या जवळ देखील मंदिर किंवा रस्त्याच्या कडेला ही मंडळी झोपत असे. सध्या लॉकडाउनमुळे हे शारीरिक अंतर सांभाळणे सर्वांनाच कठीण झाले आहे. कमीत-कमी तीन फुटाचे अंतर दोन व्यक्तींमध्ये असणे गरजेचे आहे. सध्य परिस्थितीत चारपेक्षा अधिक लोक एकत्रित असणे धोक्‍याचे असले तरी या भागात आठ ते दहा नागरीक एकत्र राहत आहे.

इथे आला प्रत्यय
गांधीनगर झोपडपट्टीत हाच प्रत्यय आला आहे. दाटीवाटीची घरे आणि जागा अपूरी असल्याने झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण करणे आवाहानात्मक झाले होते. याच भागात दोघांना संसर्ग झाल्याने परिसर सील करण्यात आला होता. बऱ्याच नागरीकांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने लक्षणे आढळल्यास विलगीकरण करणे देखील अवघड आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करणार कसे हा मोठा प्रश्‍न सध्या झोपडपट्टी परिसरातील नागरीकांसमोर उभा आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.