Social Media : केवळ सोशल मिडियावरील माहितीमुळे आजोबांची त्यांच्या कुटुंबियांशी झाली भेट

लोणी, ता. आंबेगाव येथील प्रकाश पोपटलाल शाह (वय-68 वर्ष) हे आजोबा उपचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात गेले. मात्र, भोसरी परिसरात गेल्यावर ते भरकटले.
Prakash Shah
Prakash ShahSakal
Updated on

पारगाव - लोणी, ता. आंबेगाव येथील प्रकाश पोपटलाल शाह (वय-68 वर्ष) हे आजोबा उपचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात गेले. मात्र, भोसरी परिसरात गेल्यावर ते भरकटले. कुटुंबापासून पाच दिवसापासून ताटातूट झालेले आजोबा पाच दिवसापासून भोसरी उड्डाणपुला खाली एकाच ठिकाणी बसलेले असल्याची माहिती येथील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समजली.

कार्यकत्यांनी आजोबांच्या जवळ पडलेल्या आधार कार्डवरील त्रोटक माहिती सोशल मिडीयावर व्हायरल केल्यावर त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागल्याने सोशल मीडियामुळे पाच दिवसापासून बेपत्ता असलेले आजोबा सुखरूप घरी परतले आहे.

प्रकाश पोपटलाल शहा हे रविवार (दि. ८) रोजी सकाळी मुलगा परेश शहा यांच्याकडून २०० रुपये घेऊन, मी पाबळ येथील देवाचे दर्शन घेऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. रात्री घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबांनी सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते सापडले नाही.

त्यामुळे परेश शहा यांनी पारगाव पोलीस ठाण्यात वडील प्रकाश शहा हरवल्याची तक्रार दिली. व त्यांचा फोटो व वर्णन फेसबुक व व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केली. तब्बल पाच दिवस उलटूनही आजोबांचा कोठेही शोध लागत नसल्याने शहा कुटुंब चिंताग्रस्त झाले होते.

केवळ सोशल मीडियामुळे प्रकाश शाह या आजोबांचा भोसरी या ठिकाणी शोध लागल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोसरी येथील उड्डाणपुलाखाली मागील पाच दिवसांपासून एक वृद्ध आजोबा बसलेले असुन ते कुणाकडे काही मागत नव्हते आणि कुणी काही दिले तर घेतही नव्हते. अगदी खाण्यापिण्याची वस्तू देखील ते अनोळखी माणसाकडून घेत नव्हते.

हा प्रकार राहुल रानेर यांच्या निदर्शनास आला. रानेर यांनी आजोबांच्या जवळ जाऊन आजूबाजूला पाहणी केली. तिथे त्यांना एक आधारकार्ड सापडले. त्यावरील फोटो आजोबांच्या चेहऱ्याशी जुळत असल्याने त्याची माहिती राहुल यांनी सोशल मिडियावरून श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे धीरज झोडगे यांना दिली. धीरज झोडगे यांनी ही माहिती सोशल मिडियावरून त्यांचे मामा देविदास गिरमे यांना दिली.

आधार कार्डवर पूर्ण पत्ता नव्हता, केवळ लोणी एवढेच गाव होते. त्यामुळे आजोबांचा पत्ता शोधणे कठीण होते. गिरमे यांनी त्यावरील पिन कोड वरून गावाचे नाव शोधले. त्यांचे गाव आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गिरमे यांनी त्या परिसरातील कान्हूर मेसाई येथील त्यांचे मित्र दादा बोऱ्हाडे यांना सोशल मिडियावरून ही माहिती दिली.

बोऱ्हाडे यांनी लोणी येथील सोशल मिडिया ग्रुपवर ही माहिती टाकताच काही मिनिटांमध्ये आजोबांचा मुलगा परेश व हरेश शहा यांनी देविदास गिरमे यांच्याशी संपर्क साधला. आजोबांच्या कुटुंबांनी भोसरी येथे धाव घेतली आणि आजोबा व कुटुंबाची भेट झाली.

तब्बल पाच दिवस आजोबांनी अन्नाचा कण देखील खाल्ला नव्हता. त्यांच्या नात्यातील एकजण आले आणि त्यांच्या हातून त्यांनी दोन-तीन काजू खाल्ले. त्यानंतर शहा यांना डॉ. संचित लंघे यांच्या राजगुरुनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात ट्रीटमेंट सुरु होती. त्यामुळे ते नेहमी एकटे उपचारासाठी येत असत.

असेच ते यावेळी देखील आले असावे येताना काही पैसे, मोबाईल फोन आणि हॉस्पिटलशी संबंधित कागदपत्रे घेऊन ते आले होते. मात्र भोसरी येथे आल्यानंतर ते भरकटले आणि पुलाखाली बसले. दरम्यान, चोरट्यांनी शहा यांचा मोबाईल फोन चोरून नेला. त्यांच्याकडील पैसेही काढून घेतले. हॉस्पिटलशी संबंधित कागदपत्रे असलेली पिशवी देखील त्यांच्याजवळ नव्हती.

सुदैवाने केवळ आधार कार्ड त्यांच्या आजूबाजूला पडलेले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेता आला. श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे उत्सव प्रमुख देविदास नामदेव गिरमे, मंडळाचे सर्व सभासद, चाळीशीचा उंबरठा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे सहकारी यांनी आजोबांना त्यांच्या नातेवाईकांच्याकडे सुखरूपपणे ताब्यात दिल्याने ताटातूट झालेल्या आजोबा व त्यांच्या कुटुंबाची भेट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.