पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय हाती घेण्यात आले आहे. यावेळी पीपल्स ऑफ अॅनिमल्स या स्वयंसेवी संस्थेने उद्धृत केलेल्या दराला मान्यता देण्यात आली.
कॅन्टोन्मेंट - पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या (Pune Cantonment Board) बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय (Important Decision) हाती घेण्यात आले आहे. यावेळी पीपल्स ऑफ अॅनिमल्स या स्वयंसेवी संस्थेने उद्धृत केलेल्या दराला मान्यता देण्यात आली, ज्यामध्ये एनजीओ मार्फत पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातून भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना नसबंदी, अँटीरॅबीज लसीकरण आणि 57 दिवसांच्या शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेण्यासाठी त्यांच्या टायअप सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर कुत्र्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात येईल. भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या (AWBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार कुत्र्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडले जाईल. 500 कुत्र्यांसाठी प्रारंभिक करार केला जाईल आणि त्यानंतर बोर्डाकडून आढावा घेतला जाईल.
पुणे कँटोन्मेंट बोर्डाची आज दि. (1 फेब्रुवारी) रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यासभेत बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आरआर कामथ, सीईओ अमित कुमार, आमदार सुनील कांबळे आणि नवनिर्वाचित बोर्ड उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी मथुरावाला यांनी उपाध्यक्ष पदाची शपथ ग्रहण केली.
यावेळी बोर्डाने अतिरिक्त पार्किंग स्थळांना मान्यता दिली आहे. यामध्ये -
१) डेक्कन टॉवर सोसायटी ते घर क्र. ३ सोलापूर बाजार
२) घर क्रमांक २७६ एमजी रोड ते एच नं ३३० वीपी स्ट्रीट
३) एच नंबर ६४६ साचापीर स्ट्रीट ते एच नंबर ६५७ साचापीर स्ट्रीट
4) आरडब्ल्यूआयटीसी (RWITC)
कंपाऊंडची बाहेरील भिंत
तसेच बोर्डाने छावणीच्या प्रमुख रस्त्यांवर विशेषतः सार्वजनिक उपद्रव निर्माण करणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. एमजी रोड, ईस्ट स्ट्रीट, मोलेदिना रोड, घोरपडी, एम्प्रेस गार्डन रोड, वानवडी रोड आदी भागात उपद्रव प्रतिबंधक पथक आणि संपूर्ण टीम रस्त्याच्या कडेला फेरीवाले व विक्रेत्यांवर छापे टाकतील आणि साहित्य जप्त करतील, जेणेकरून उपद्रव रोखण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी पदपथांवरील गर्दी कमी होईल.
तसेच कुंभार बावडी मार्केट, घोरपडी भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी मार्केट इत्यादी ठिकाणी फेरीवाले विक्रेत्यांना मासिक पास देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
त्याच बरोबर रस्त्यांसाठी बिटुमिनस मॅकॅडम आणि सेमी-डेन्स कॉंक्रिट या दोन्ही हॉट मिक्स्ड हॉट लेड विथ पेव्हर फिनिशच्या तरतुदीसाठी बोर्डाने तीन कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे.
बोर्डाने जिल्हाधिकारी/राज्य सरकारच्या वतीने पीडबल्यूडी
(PWD) मार्फत छत्रपती शिवाजी मार्केटच्या नूतनीकरणाच्या कामाला मान्यता दिली आहे. ज्याची रक्कम अंदाजे रु. २.५० कोटी आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाने अंदाजे खर्चाच्या 50 टक्के म्हणजे 1.25 कोटी रुपयांचा वाटा उचलायचा आहे, त्यापैकी आमदार सुनील कांबळे यांनी डीपीडीसी मार्फत पीडबल्यूडी ला 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.