Someshwar Sugar Factory : सोमेश्वर कारखान्याची पहिली उचल तीन हजार - पुरुषोत्तम जगताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल प्रतिटन तीन हजार रुपये प्रमाणे देण्याचा निर्णय घेतला.
Purushottam Jagtap
Purushottam Jagtapsakal
Updated on

सोमेश्वरनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल प्रतिटन तीन हजार रुपये प्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जानेवारीपासून कार्यक्षेत्रातील सभासद, बिगरसभासदांना या उचलीसोबत प्रोत्साहन अनुदानही देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

एफआरपीच्या सध्याच्या सूत्रानुसार 10.25% साखर उताऱ्यावर सोमेश्वरची एफआरपी 2458 रुपये प्रतिटन इतकी तर एकरकमी सूत्रानुसार प्रतिटन 2958 रुपये इतकी येत आहे. सध्या उसाची टंचाई असल्याने अधिकाधिक ऊस मिळवण्याच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील छत्रपती, भीमा पाटस या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार रुपये उचल दिली आहे. या स्पर्धेत सोमेश्वरने अनुदानासह उचल देण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमेश्वरच्या संचालक मंडळाच्या आज सायंकाळी झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रतिटन तीन हजार रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 डिसेंबरपासून ही उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. गेटकेनधारक व सभासद यांच्यासाठी ही उचल समान असणार आहे.

दरम्यान, कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या जानेवारीत तुटणाऱ्या उसाला 75 रुपये, फेब्रुवारीत शंभर रुपये तर मार्चनंतर हंगाम संपेपर्यंत प्रतिटन दीडशे रुपये असे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जानेवारीत 3075, फेब्रुवारीत 3100 तर मार्चपासून 3150 रुपये प्रतिटन अशी एकरकमी उचल मिळणार आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.

आजपर्यंत सोमेश्वरने सव्वातीन लाख टन ऊस गाळप केले असून 3 लाख 30 हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. 10.32 टक्के इतका जिल्ह्यातील चांगला साखर उतारा प्राप्त केला आहे. तर आतापर्यंत 1कोटी 97 लाख युनीट वीज तर 16 लाख 65 हजार लिटर अल्कोहोल तयार केले आहे, असेही जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()